रेडमीच्या या दोन फोन्स पैकी एक पांढरा तर दुसरा ड्युअल टोन बरगंडी किंवा ब्राऊन रंगामध्ये असणार आहे. मात्र त्याची स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आलेली नाही.
Photo Credit: Xiaomi
रेडमी नोट १४ प्रो ५जी (चित्रात) आणि प्रो+ व्हेरियंट अलीकडेच शॅम्पेन गोल्ड शेडमध्ये लाँच करण्यात आले
Redmi या Xiaomi च्या सब ब्रॅन्ड कडून भारतामध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. रेडमीच्या भारतातील 11 व्या वर्षपूर्तीचं औचित्य साधत हे फोन लॉन्च होणार आहेत. याबाबत स्मार्टफोन कंपनीने सोशल मीडीयामध्ये घोषणा केली आहे सोबत टीझरही जारी केला अअहे. आता रेडमी चे हे दोन नवे फोन भारतामध्ये 23 आणि 24 जुलै दिवशी लॉन्च होणार आहेत. रेडमी कडून या फोनच्या स्पेसिफिकेशन आणि मॉडेल्सच्या नावांबद्दलची सविस्तर माहिती दिलेली नाही. रेडमीने या जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच Champagne Gold रंगामध्ये Note 14 Pro+ 5G आणि Note 14 Pro 5G आणला आहे. हे नवीन रंग पूर्वी उपलब्ध असलेल्या Spectre Blue, Titan Black, आणि Phantom Purple (लेदर बॅक फिनिशसह) मध्ये सामील होतात.
मंगळवार, 22 जुलै दिवशी केलेल्या X या सोशल मीडीयावरील पोस्ट मध्ये Redmi India ने फोन कंपनीला देशात 11 वर्ष पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. रेडमीचा भारतामधील पहिला स्मार्टफोन Mi 3 होता. Mi 3 भारतामध्ये 22 जुलै 2014 ला लॉन्च झाला होता. आता 11 वर्षांचा टप्पा साजरा करण्यासाठी रेडमी ने नव्या दोन फोनची घोषणा केली आहे.
Redmi India ने दाखवलेल्या टीझरनुसार, पहिला स्मार्टफोन 23 जुलै दिवशी लॉन्च होईल, जो पांढर्या रंगामध्ये असणार आहे . ज्यात रेडमी चं व्हर्टिकल ब्रॅन्डिंग दिलेलं आहे. दुसरं मॉडेल 24 जुलै दिवशी रीलीज केले जाईल जो फोन ड्युअल टोन बरगंडी रंगामध्ये असणार आहे. दोन्ही फोनच्या मागच्या बाजूला प्रिमियम फिनिश असणार आहे. पोस्टमध्ये असे सूचित केले आहे की नवीन स्मार्टफोन्स मध्ये बॅटरी क्षमता आणि कार्यक्षमतेवर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच 11 वर्षांच्या प्रवाससाठी आभारही मानले आहेत.
रेडमी ने दोन्ही फोनबद्दल अधिक माहिती दिलेली नाही पण हे फोन नोट 14 सीरीज मधील असू शकतात किंवा नव्या सब ब्रॅन्डची घोषणा केली जाईल. सध्या रेडमी च्या या दोन्ही स्मार्टफोनला घेऊन चर्चा सुरू आहे. एक्सपर्ट्स अंदाजानुसार या रेडमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये डिझाईन पासून यूजर एक्सपरिएन्स मध्ये बदल केले जाऊ शकतात.
दरम्यान, नोट मालिकेतील शाओमीच्या पुढील फ्लॅगशिप Redmi Note 15 Pro+ बद्दलही अंदाज बांधले जात आहेत. कंपनीने गेल्या सप्टेंबरमध्ये चीनमध्ये Redmi Note 14 Pro+ लाँच केला होता आणि त्याच्या उत्तराधिकारीबद्दल ऑनलाइन लीक समोर येऊ लागले आहेत.
जाहिरात
जाहिरात