Xiaomi भारतात 9 डिसेंबरला लॉन्च करणार 3 स्मार्टफोन; पहा फीचर्स काय

Redmi Note 14 5G भारतामध्ये Android 15-based HyperOS 2.0. वर चालणार आहे

Xiaomi भारतात 9 डिसेंबरला लॉन्च करणार 3 स्मार्टफोन; पहा फीचर्स काय

Photo Credit: Redmi

Redmi Note 14 5G चीनमध्ये सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आला होता

महत्वाचे मुद्दे
  • भारतात Redmi Note 14 5G मध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra SoC चीप असणा
  • Redmi Note 14 5G भारतामध्ये Redmi Note 14 Pro+ आणि Redmi Note 14 Pro
  • Redmi Note 14 5G भारतामध्ये दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार
जाहिरात

Redmi Note 14 5G भारतामध्ये Redmi Note 14 Pro+ आणि Redmi Note 14 Pro सह 9 डिसेंबर ला लॉन्च होणार आहे. हा लाईनअप चीन मध्ये सप्टेंबर महिन्यात समोर आला होता. यामध्ये फोन IP68 rating सह असल्याने ते फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. भारतामध्येही हे स्मार्टफोन चीन प्रमाणेच लॉन्च होणार आहेत. भारतामध्ये लॉन्च पूर्वी Redmi Note 14 5G हा अमेझॉन वर उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबत काही फीचर्स आणि रंगांचे पर्याय देखील समोर आले आहेत.

Redmi Note 14 5G Amazon हा स्मार्टफोन भारतामध्ये Amazon India च्या मायक्रोसाईट वर उपलब्ध असणार आहे. Xiaomi India च्या वेबसाईट वर देखील हा फोन उपलब्ध असणार आहे. दरम्यान Redmi Note 14 5G मध्ये 50-megapixel Sony LYT-600 primary rear camera sensor आणि optical image stabilisation असणार आहे. चीनी व्हेरिएंट मध्ये 2-megapixel secondary depth sensor आणि 16-megapixel selfie shooter आहे. त्यामुळे भारतातील व्हेरिएंट मध्येही हेच स्पेसिफिकेशन असतील अशी माहिती आहे.

Redmi Note 14 5G चं डिझाईन देखील चीनी स्मार्टफोन प्रमाणे असणार आहे. हा फोन काळा आणि पांढर्‍या मार्बल पॅटर्न मध्ये उपलब्ध असणार आहे.

भारतामध्ये Redmi Note 14 5G हा स्मार्टफोन ब्राईट डिस्प्ले सह येणार आहे. यामध्ये advanced privacy features असतील. AiMi हा AI assistant असणार आहे. फोनच्या चायनीज मॉडेल मध्ये 6.67-inch full-HD+ AMOLED screen असणार आहे. 120Hz refresh rate असणार आहे. 2,100 nits of peak brightness level आणि Corning Gorilla Glass protection असणार आहे.

Redmi Note 14 5G च्या चीनी स्मार्टफोनप्रमाणे भारतातही हा फोन MediaTek Dimensity 7025 Ultra SoC सह असणार आहे. यामध्ये IP64-rated build असेल ज्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असेल. फोनमध्ये 5,110mAh बॅटरी असणार आहे. सोबत फोनला 45W wired fast charging support असणार आहे. हा फोन Android 15-based HyperOS 2.0 वर चालणार आहे.

फोनबाबतच्या पूर्वीच्या लीक्स प्रमाणे Redmi Note 14 5G हा भारतामध्ये 6GB + 128GB व्हेरिएंट्स साठी Rs. 21,999 ला लॉन्च होऊ शकतो. तर 8GB + 128GB साठी Rs. 22,999 आणि 8GB + 256GB साठी Rs. 24,999 मोजावे लागणार आहेत.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

संबंधित बातमी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Galaxy S26 सिरीज कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पुन्हा समोर; नवीन लीक्समध्ये पूर्ण सेटअपची समोर आली माहिती
  2. OnePlus 15 नवीन जनरेशन प्रोसेसरसह आला भारतात; 7,300mAh बॅटरी आणि किंमतीचे अपडेट्स आले समोर
  3. itel A90 128GB लिमिटेड एडिशन भारतात लाँच; पहा फोनमध्ये काय आहे खास?
  4. OPPO Reno 15 व Reno 15 Pro भारतात लॉन्चसाठी होतोय सज्ज; पहा कॅमेरा ते रंगांपर्यंतची काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स
  5. Poco F8 Ultra Geekbench वर दिसताच चर्चेला उधाण; स्कोअर पाहून चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता
  6. Vivo X300 सिरीज भारतात लॉन्च होणार लवकरच, Zeiss कॅमेरासह दमदार फीचर्स
  7. Realme Neo 8 होणार पॉवरहाऊस! 8,000mAh बॅटरीसह येऊ शकतो फोन
  8. iPhone 18 Pro Max मध्ये वाढणार वजन आणि जाडी; पहा अपडेट्स
  9. OnePlus चा पुढील स्मार्टफोन देणार गेमिंगसाठी जबरदस्त 240Hz डिस्प्ले अनुभव ? पहा अपडेट्स
  10. iQOO कडून सर्विस डे विशेष घोषणा; ग्राहकांना मिळणार मोफत बॅक केस आणि प्रोटेक्टिव्ह फिल्म
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »