Photo Credit: Redmi
Redmi Note 14 Pro+, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 भारतामध्ये सोमवारी लॉन्च झाला आहे. Xiaomi च्या या नव्या Note series smartphones मध्ये 6.67-inch OLED displays सोबत 120Hz refresh rate आणि 3000nits peak brightness आहे. Redmi Note 14 चं बेस मॉडेल हे MediaTek Dimensity 7025 Ultra chipset वर चालतं सपोतर Note 14 Pro मॉडेल MediaTek Dimensity 7300-Ultra SoC सह आहे. Redmi Note 14 Pro+ हे प्रिमियम मॉडेल Snapdragon 7s Gen 3 SoC वर चालते. यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे. त्यामध्ये 50-megapixel primary camera आणि 6,200mAh batteryसह 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. प्रो मॉडेल IP68 पाणी आणि धूळीपासून संरक्षण करणारे आहे. तर व्हेनिला मॉडेल IP64 rated build आहे.
Redmi Note 14 Pro+ ची किंमत - 8GB + 128GB साठी Rs. 29,999 आहे. 8GB + 256GB या व्हेरिएंट साठी Rs. 31,999 आणि 12GB + 512GB साठी Rs. 34,999 आहे.
Redmi Note 14 Pro ची किंमत Rs 23,999 पासून सुरू होते. ही किंमत 8GB + 128GB व्हेरिएंट साठी आहे. 8GB + 256GB साठी Rs. 25,999 मोजावे लागणार आहेत तर प्रो मॉडेल हे Spectre Blue, Phantom Purple, आणि Titan Black रंगामध्ये उपलब्ध आहे.
Redmi Note 14 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची भारतामध्ये किंमत Rs. 17,999 आहे. 8GB + 128GB ची किंमत Rs. 18,999 तर 8GB + 256GB ची किंमत Rs. 20,999 आहे. हा स्मार्टफोन Titan Black, Mystique White, आणि Phantom Purple रंगांमध्ये उपलब्ध आहे.
तिन्ही मॉडेल्स Mi.com, Flipkart आणि रिटेल स्टोअर्स मध्ये 13 डिसेंबरला दुपारी 12 पासून विक्रीला उपलब्ध असतील.
Redmi Note 14 Pro+ हा ड्युअल सीम फोन आहे. तो Android 14-based HyperOS 1.0 interface वर चालणार आहे. 6.67-inch 1.5K (1,220x2,712 pixels) resolution display आहे. तर 120Hz refresh rate, 3000nits peak brightness आहे. Redmi Note 14 Pro+ चा डिस्प्ले हा Corning Gorilla Glass Victus 2 protection सह आहे. त्याच्या बॅक पॅनल वर Corning Gorilla Glass 7i कोटिंग आहे. यामध्ये 4nm Snapdragon 7s Gen 3 chipset आहे. तर फोनची रॅम 12GB आणि ऑनबोर्ड स्टोरेज 512GB आहे.
Redmi Note 14 Pro+ मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे. 50-megapixel Light Hunter 800 sensor आहे. 8-megapixel ultra wide-angle sensor आणि 50-megapixel telephoto camera ज्यात 2.5x optical zoom आहे. फोनच्या फ्रंटला 20-megapixel sensor आहे.
जाहिरात
जाहिरात