Samsung त्यांच्या Galaxy A मालिकेमधील पुढचा स्मार्टफोन केव्हा लॉन्च करणार ह्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे सर्वत्र येणाऱ्या आगामी स्मार्टफोनची म्हणजेच Samsung Galaxy A06 ची चर्चा सुरू असतानाच ह्या स्मार्टफोनने FCC, WiFi Aliance, SIRIM आणि BIS अशी प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्यानंतर Onleaks कडून समोर आलेल्या एका रेंडर मध्ये ह्या स्मार्टफोनची डिझाइन कशी असणार आहे, ह्याबाबत माहिती मिळते. ह्या रेंडर वरून लक्षात येते की, Samsung Galaxy A06 हा मागच्याच वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy A05 चा पुढचा स्मार्टफोन असणार आहे. तर मग पाहुयात, ह्या स्मार्टफोनबाबत रेंडर मधून आपल्याला काय माहिती मिळते.
Samsung Galaxy A06 ची किंमत आणि डिझाइन.
रेंडर मधून समोर आलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy A06 हा स्मार्टफोन Infinity U डिस्प्ले सोबत एका फ्लॅट फ्रेमसह दिसत आहे. ह्या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला ब्रँडचे की आयलंड डिझाइन देण्यात आले आहे जे मागच्या वर्षीच्या स्मार्टफनमध्ये सुद्धा देण्यात आले होते. ह्याच्या मागच्या बाजूस फ्लॅश सोबत रियर कॅमेरा आणि सेन्सर दिसून येतात. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस पॉवर की आणि ध्वनी बटन देण्यात आले आहेत. USB पोर्ट, स्पीकर आणि हेडफोन जॅक हे Samsung Galaxy A06 च्या तळाशी दिसून येतात. हा स्मार्टफोन सध्यातरी काळया आणि चंदेरी रंगात उपलब्ध होणार असल्याचे ही लक्षात येते.
रेंडर मधून ह्या स्मार्टफोनची अंदाजे किंमत कळते, जी 18,000 च्या आसपास असू शकते. शिवाय ही किंमत स्मार्टफोनच्या विविध प्रकारांवर देखील अवलंबून असणार आहे, ज्यामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे. Samsung Galaxy A06 ची वैशिष्ट्ये.
रेंडर मधून मिळालेल्या अहवालानुसार ह्या स्मार्टफोनचा आकार 167.3 x 77.9 x 8.0 मिमी इतका असणार आहे. सोबतच Samsung Galaxy A06 ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा फुल HD रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा असण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy A06 ह्या स्मार्टफोनला FCC कडून मिळालेल्या प्रमाणपत्रामधून दिसून येते, ह्या स्मार्टफोनची बॅटरी ही 5000mAh ची असणार आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G85 ह्या प्रोसेसर चे समर्थन करेल. ह्याची रॅम ही 6GB पासून सुरू होणार असली तरी हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर ह्यामध्ये रॅम आणि स्टोरेजच्या आधारावर विविध प्रकार असण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. रेंडरमधून अद्यापही Samsung Galaxy A06 च्या वैशिष्ट्यांबाबत सविस्तर माहिती मिळालेली नसून कंपनीकडून याबाबत लवकरच खुलासा करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.