आजच खरेदी करा सॅमसंगचा नवीन Samsung Galaxy M35 5G, आणि वाचवा 4000 रुपये

सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईट वर Samsung Galaxy M35 5G खरेदी केल्यावर 1000 रुपयांची सूट आणि 1000 रुपयांचा कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो.

आजच खरेदी करा सॅमसंगचा नवीन Samsung Galaxy M35 5G, आणि वाचवा 4000 रुपये

Photo Credit: Samsung

महत्वाचे मुद्दे
  • 50 मेगापिक्सलचा मागील कॅमेरा 6000 mAh ची बॅटरी फक्त Samsung Galaxy M35 5G
  • Samsung Galaxy M35 5G 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज, फक्त 19,999 रुपयांमध्ये.
  • Samsung Galaxy M35 5G वर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
जाहिरात
17 जुलै 2024 रोजी, सॅमसंग ने Samsung Galaxy M35 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच केला. 6000 mAh ची बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेटचा Amoled डिस्प्ले आणि सॅमसंग चा नेहमीचाच गोरिल्ला ग्लास जो डिस्प्लेला मजबूत संरक्षण देतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन मूनलाईट ब्लू, डे ब्रेक ब्लू आणि थंडर ग्रे अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग बघुयात, नुकत्याच लाँच झालेल्या Samsung Galaxy M35 5G वर कोणत्या ऑफर्स आहेत आणि त्याची किंमत काय आहे.

Samsung Galaxy M35 5G ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स.

  1. 6GB रॅम + 128GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 19,999 रूपये.
  2. 8GB रॅम + 128GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 21,499 रुपये.
  3. 8GB रॅम + 256GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 24,499 रुपये. 

तुम्हाला सुद्धा हा स्मार्टफोन विकत घेण्याची घाई असेल ना, तर तुम्ही हा फोन 20 जुलै पासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईट वरून आणि Amazon वर 20 किंवा 21 जुलै पासून खरेदी करू शकता. 

काही मर्यादित कालावधीपर्यंत सॅमसंग कंपनी Samsung Galaxy M35 5G ह्या स्मार्टफोन वर 1000 रुपयांची सूट देत आहे. त्यासोबतच काही निवडक बँकेच्या क्रेडिट कार्ड वर 2000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. आणि जर तुम्ही आधीच एक सॅमसंग M सिरीज वापरकर्ते आहात, तर तुम्हाला 1000 रुपयांचा कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो.

Samsung Galaxy M35 5G ची वैशिष्ट्ये


Samsung Galaxy M35 5G मध्ये तुम्हाला 1,080 x 2,340 पिक्सेल सोबत FHD, इन्फिनिटी O, 120 Hz चा रिफ्रेश रेट असणारा सुपर AMOLED आणि 6.62 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. 1000 nits इतका तेजस्वी आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लासचे संरक्षण देखील ह्या डिस्प्लेला देण्यात आले आहे.

ह्या स्मार्टफोन ची बॅटरी 6000 mAh ची असून 25w चार्जिंगचे समर्थन करते, जी एकदा चार्ज केल्यानंतर संपूर्ण दिवस चालण्यासाठी सक्षम आहे.

Samsung Galaxy M35 5G मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, मागचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असा हा सेट अप आहे.

हा स्मार्टफोन 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, GPS आणि USB टाइप-C सह 5G कनेक्टिव्हिटीला समर्थन देतो आणि वजन फक्त 222 ग्रॅम. 
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »