सॅमसंगचा नवा मिड रेंज स्मार्टफोन लवकरच येणार; पहा 50 मेगा पिक्सेलच्या रेअर, सेल्फी कॅमेर्‍यात काय फीचर्स असू शकतात?

सॅमसंगचा नवा मिड रेंज स्मार्टफोन लवकरच येणार; पहा 50 मेगा पिक्सेलच्या रेअर, सेल्फी  कॅमेर्‍यात काय फीचर्स असू शकतात?

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy M55s is equipped with a triple rear camera setup

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy M55s भारतामध्ये 23 सप्टेंबरला होणार लॉन्च
  • 'Nightography' low light camera आणि No Shake Cam mode ची फिचर्स असणार
  • स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 chipset सोबर पेअर केलेला 256GB स्टोरेजचा
जाहिरात

सॅमसंग गॅलेक्सी एम55एस (Samsung Galaxy M55s) लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान साऊथ कोरियन फर्म कडून आगामी Galaxy M series smartphone दोन रंगांमध्ये आणि आकर्षक फीचर्स मध्ये उपलब्ध असेल असे सांगितले आहे. सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन 6.7 इंच डिस्प्ले चा असणार आहे. सोबतच 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रेअर कॅमेरा असणार आहे तर सेल्फी कॅमेरा देखील त्याच रेस्झुलेशनचा असणार आहे. Samsung Galaxy M55चा जो रिव्ह्यू या वर्षाच्या सुरूवातीला जारी करण्यात आला होता त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 chipset सोबर पेअर केलेला 256GB स्टोरेजचा आहे.

Samsung Galaxy M55s भारतामध्ये कधी होणार लॉन्च?

Samsung Galaxy M55s भारतामध्ये 23 सप्टेंबर 2024 दिवशी लॉन्च होणार आहे. नुकतीच कंपनीकडून या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. सॅमसंगचा हा मिडरेंज स्मार्टफोन आहे. या फोनच्या रॅम आणि स्टोरेजची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असेल Samsung Galaxy M55s ?

Samsung Galaxy M55s हा स्मार्टफोन कोरल ग्रीन Coral Green) आणि थंडर ब्लॅक(Thunder Black) या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Samsung Galaxy M55s ची काय स्पेसिफिकेशन्स असण्यची शक्यता?

अमेझॉन वरील मायक्रोसाईटच्या माहितीनुसार, Samsung Galaxy M55s च्या स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. ज्यामध्ये या फोनची स्क्रिन 6.7 इंचाची Super AMOLED+ असेल याची खात्रीशीर माहिती दिली आहे. तर रिफ्रेश रेट 120Hzअसणार आहे. 1,000nits हा सर्वाधिक ब्राईटनेस असणार आहे. Samsung च्या माहितीनुसार, या फोनची जाडी 7.8 mm असणार आहे. त्यामुळे हा फोन Galaxy M55 model प्रमाणे असू शकतो. हा फोन भारतात सॅमसंगने एप्रिल महिन्यात लॉन्च केला होता.

सॅमसंग च्या Galaxy M55s फोन मध्ये कॅमेरा कसा असेल याची देखील माहिती समोर आली आहे. करण्यात आलेल्या खात्रीशीर दाव्यानुसार, रेअर कॅमेरा 50 मेगापिक्सेल असाणार आहे. ज्याला optical image stabilisation असणार आहे. तर 8 मेगा पिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा असणार आहे आणि 2 मेगा पिक्सेल माक्रो कॅमेरा असणार आहे. यामध्ये दोन्ही 'Nightography' low light camera आणि No Shake Cam mode असणार आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, Samsung Galaxy M55s मध्ये 50 मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील असणार आहे. या मोबाईल मध्ये युजर्सना एकाचवेळी फोटो आणि व्हिडिओ फ्रंट आणि रेअर कॅमेर्‍याच्या माध्यमातून समांतर वापरता येऊ शकतो.

Galaxy M55s ची अन्य फीचर्स लवकरच ग्राहकांसमोर येतील. Galaxy M55s 4G हा स्मार्टफोन विक्रीसाठी खुला झाल्यानंतर तो Amazon, Samsung.com आणि निवडक रिटेल दुकानांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »