सॅमसंगच्या नव्या फोन मध्ये Snapdragon 7 Gen 1 chipset, 20 हजारांपेक्षा कमी रूपयांत 50 मेगापिक्सेलच्या मोबाईलची खरेदी करण्याची संधी

सॅमसंगच्या नव्या फोन मध्ये Snapdragon 7 Gen 1 chipset, 20 हजारांपेक्षा कमी रूपयांत 50 मेगापिक्सेलच्या मोबाईलची खरेदी करण्याची संधी

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy M55s 5G comes in Coral Green and Thunder Black shades

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy M55s 5G हा नवा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 chipset
  • 8GB + 128GB या व्हेरिएंट साठी 19,999 रूपये मोजावे लागणार आहेत
  • भारतामध्ये हा स्मार्टफोन Amazon, Samsung India website आणि ऑफलाईन
जाहिरात

Samsung Galaxy M55s 5G हा नवा स्मार्टफोन भारतामध्ये सोमवार (23 सप्टेंबर) दिवशी लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 chipset आणि 50-megapixel ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट सह लॉन्च झाला आहे. 50 मेगा पिक्सेल सेल्फी शूटर देखील या फोनमध्ये आहे. तर या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh बॅटरी असणार आहे तर 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोन मध्ये मागील बाजू dual-textured finish चा असणार आहे. या फोन मध्ये Samsung Galaxy F55 5G सारखीच फीचर्स असणार आहेत. आता हा स्मार्टफोन देशात विक्रीसाठी खुला आहे.

भारतामध्ये Samsung Galaxy M55s 5G ची किंमत काय आहे?

Samsung Galaxy M55s 5G ची भारतामध्ये 8GB + 128GB या व्हेरिएंट साठी 19,999 रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान 8GB + 256GB व्हेरिएंट साठी 22,999 रूपये मोजावे लागणार आहेत. भारतामध्ये हा स्मार्टफोन Amazon, Samsung India website आणि ऑफलाईन स्वरूपात काही रिटेल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असणार आहे. 26 सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरू होत आहे. युजर्सना बॅंक ऑफ़र्सचा फायदा घेतल्यास 2000 रूपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन अजून थोडा स्वस्तात विकत घेता येणार आहे.

Samsung Galaxy M55s 5G कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे?

Samsung Galaxy M55s 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. कोरल ग्रीन आणि थंडर ब्लॅक या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

Samsung Galaxy M55s 5G ची स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स काय आहेत?

Samsung Galaxy M55s 5G या सॅमसंगच्या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच फूच एचडी आणि sAMOLED screen असणार आहे. त्यामध्ये 120Hz refresh rate असणार आहे तर 1,000nits peak brightness level असणार आहे. हा फोन Snapdragon 7 Gen 1 SoC वर चालणार आहे. या स्मार्टफोन मध्ये 8 जीबी पर्यंत व्हर्चुअल रॅम आणि 256 जीबी पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज असणार आहे.

Samsung Galaxy M55s 5G च्या कॅमेर्‍याचा विचार करता त्यात ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आहे त्यामध्ये
optical image stabilisation चा पर्याय असणार आहे. 8 मेगा पिक्सेल सेंसर ultra-wide-angle lens सोबत पेअर केलेला असणार आहे. सोबतच 2 मेहा पिक्सेल macro shooter असणार आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 50 मेगा पिक्सेल सेंसरचा असणार आहे. तर फोन मध्ये dual recording ची सोय आहे. त्यामुळे एकाचवेळी युजर्स फ्रंट आणि बॅक कॅमेराचा वापर करून शुटिंग करता येणार आहे.

Samsung Galaxy M55s 5G मध्ये 5,000mAh बॅटरी असणार आहे. तसेच फोनला 45W wired चार्जिंग असणार आहे. या फोनमध्ये Knox Vault security आहे. तर in-display fingerprint sensor आहे. हा स्मार्टफोन 7.8mm जाडीचा असणार आहे.

Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »