Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये Galaxy Ring 2 ते Galaxy S series काय काय पाहता येणार

Samsung.com प्रमाणेच Samsung Newsroom आणि अन्य अधिकृत युट्युब चॅनलवर Samsung Galaxy Unpacked 2025 लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे

Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये  Galaxy Ring 2 ते  Galaxy S series काय काय पाहता येणार

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy S25 मालिका Galaxy Unpacked 2025 मध्ये जाहीर केली जाईल असा अंदाज आहे

महत्वाचे मुद्दे
  • Galaxy S series मध्ये Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra या
  • 22 जानेवारीला भारतीय स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता इव्हेंट सुरू हो
  • Rs. 1,999 देऊन इव्हेंट साठी भारतीय त्यांची जागा प्रीरिझर्व्ह करू शकणार
जाहिरात

Samsung Galaxy Unpacked 2025 अमेरिकेमध्ये आज San Jose, California,मध्ये त्याची पहिली झलक दाखवणार आहे. या वार्षिक कार्यक्रमामध्ये new generation Galaxy S series ज्याला Galaxy S25 series म्हणून ओळखले जाणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या फोनमध्ये artificial intelligence (AI) experiences मध्ये मोठी लीप घेतली जाणार आहे. भारतामध्ये या फोनच्या प्री-रिझर्व्हेशनला सुरूवात झाली आहे. जे हा फोन प्री रिझर्व्ह करणार आहेत त्यांना याचे स्पेशल बेनिफिट्स मिळतील.

Samsung कडून आता Galaxy Unpacked 2025 ची माहिती देण्यात आली आहे. 22 जानेवारीला भारतीय स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता हा फोन लॉन्च होणार आहे. Samsung.com प्रमाणेच Samsung Newsroom आणि अन्य अधिकृत युट्युब चॅनलवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहक त्यांची सीट Rs. 1,999 देऊन रिझर्व्ह करू शकतात. याद्वारा Galaxy Pre-reserve VIP Pass मिळतील. सोबत 5000 रूपयांचे बेनिफिट्स मिळणार आहेत. याद्वारा त्यांना आपोआप 50 हजार रूपयांच्या गिव्हअवे ची संधी मिळणार आहे.

Samsung Galaxy Unpacked 2025 बाबत माहिती

Samsung च्या माहितीनुसार, Galaxy Unpacked 2025 event मध्ये Galaxy S series येणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पूर्वीचे ट्रेंड्स पाहता यामध्ये 3 मॉडेल्सचा समावेश आहे. ज्यात Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra आहे. हे तिन्ही व्हेरिटंस Qualcomm च्या Snapdragon 8 Elite SoC सह 12GB of RAM चे असणार आहेत.

Galaxy S25 model मध्ये 4,000mAh battery असणार आहे. तर Plus आणि Ultra व्हेरिएंट मध्ये 4,900mAh आणि 5,000mAh बॅटरीज असतील. लीक झालेल्या माहितीनुसार, Galaxy S25 Ultra मध्ये rounded corners असतील. तर अन्य मॉडेल्सच्या डिझाईन मध्ये बदल नसतील.

Galaxy S25 series सोबत extended reality (XR) headset असतील जे डिसेंबर 24 मध्ये जाहीर झाले होते. हे गूगलच्या नव्या Android XR platform वर चालतील. यामध्ये augmented reality (AR), virtual reality (VR),आणि artificial intelligence (AI) चा सपोर्ट असणार आहे. यामध्ये Galaxy S25 Slim ची झलक दिसण्याचा अंदाज आहे.

Galaxy Ring 2 देखील कार्यक्रमात दिसू शकतो असा अंदाज आहे. Oura Ring सोबत स्पर्धेत उतरण्यासाठी 2 स्लीम साईझ येण्याचा अंदाज आहे. first-generation Galaxy Ring च्या तुलनेत अधिक अचूक हेल्थ डेटा सेन्सर, सुधारित AI कार्यक्षमता आणि दीर्घ बॅटरी लाइफसह वेअरेबल येण्याचा अंदाज आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
  2. एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण
  3. Honor Magic V Flip 2 मध्ये 200MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, पहा अन्य स्पेसिफिकेशन्स काय?
  4. 2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम
  5. Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये नवा टेन्सर G5 प्रोसेसर, 8-इंच फोल्डेबल डिस्प्ले
  6. Tensor G5 चिप, AI कॅमेरा टेक्नॉलॉजीसह Google Pixel 10 Series भारतामध्ये लाँच
  7. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  8. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  9. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  10. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »