Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 7 ची किंमत बेस मॉडेल साठी 1,74,999 रूपये पासून सुरू होते.

Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा  किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Samsung

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ हा अँड्रॉइड १६ आणि वन यूआय ८ वर चालतो

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite चीपसेट
  • फोनचा आकार 4.2mm तर वजनाला हा फोन 215 ग्राम
  • फोनमध्ये 4400 mAh battery असेल तर 25W wired charging सपोर्ट असणार
जाहिरात

Samsung कडून आता अधिकृतपणे Galaxy Z Fold 7 लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या foldable smartphone series मधील पुढील फोन आहे. या फोनमध्ये सॅमसंग कडून हार्डवेअर अपग्रेड्स करण्यात येणार आहेत. सोबतच फोनच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहेत त्यामुळे फोन आता अधिक पातळ होणार आहे. पूर्वीच्या फोनपेक्षा हा वजनाला अधिक हलका असणार आहे. नवा बूक स्टाईल या सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Elite चा समावेश असणार आहे. मग पहा Galaxy Z Fold 7 मध्ये फीचर्स काय, किंमत काय?

Samsung Galaxy Z Fold 7 मधील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite चीपसेट आहे. हा फोन अनफोल्ड असतो तेव्हा त्याचा आकार 4.2mm असतो तर वजनाला हा फोन 215 ग्राम आहे. Galaxy Z Fold 7 मध्ये Gorilla Glass Ceramic 2 protectionआहे. फोनच्या मागच्या बाजूला Gorilla Glass Victus 2 reinforcement आहे. फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सिस्टम आहे. यामध्ये 200-megapixel primary sensor with Quad Pixel autofocus आहे तर optical image stabilisation चा समावेश आहे. यासोबत फोनमध्ये 12-megapixel ultra-wide lens आणि 10-megapixel telephoto unit with 3x optical zoom आहे. फोनच्या पुढल्या बाजूला 10-megapixel shooter आहे. याच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीज घेता येतील.

फोनमध्ये 4400 mAh battery असेल तर 25W wired charging सपोर्ट असणार आहे. हा फोन अर्धा तासामध्ये 50% चार्ज करता येणार आहे. याला Wireless charging आणि reverse wireless charging चा देखील सपोर्ट असणार आहे.

Samsung Galaxy Z Fold 7 ची किंमत

Samsung Galaxy Z Fold 7 ची किंमत बेस मॉडेल साठी 1,74,999 रूपये पासून सुरू होते. यामध्ये 12GB RAM आणि 256GB storage आहे. फोनचा मिड टिअर व्हर्जन 12GB RAM आणि 512GB storage चा आहे जो 1,86,999 रूपये मध्ये मिळेल. तर 16GB RAM + 1TB storage व्हेरिएंटची किंमत ₹2,10,999 आहे.

Samsung Galaxy Z Fold 7 हा स्मार्टफोन Blue Shadow, Jetblack, आणि Silver Shadow या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन माध्यमात हा स्मार्टफोन मिंट शेड मध्येही 'exclusive' उपलब्ध असणार आहे. Galaxy Z Fold 7 च्या प्री-ऑर्डर आता सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहेत, 25 जुलैपासून विक्री सुरू होईल. विशेष लाँच बेनिफिट म्हणून, 12 जुलैपर्यंत 12GB + 512GB version चा फोन 256GB model च्या किंमतीत खरेदी करू शकतात.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. ₹25 हजारांच्या बजेटमध्ये कोणता फोन बेस्ट? Moto G77 Power, Nord CE 6 Lite की iQOO Z10R 5G
  2. समुद्रातही बुडणार नाहीत अंतराळवीर! ISROच्या गगनयानची मोठी कामगिरी
  3. फोनच्या मागे मॅग्नेटिकने फिट, चार्जिंग झटपट! URBN Atom Link लॉन्च
  4. Hisense A10 ने केला धमाका! डिटॅचेबल स्क्रीनची अनोखी जादू
  5. Acerचा अनोखा फोन लॉन्च! दोन डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीची ताकद
  6. वादानंतर Metaचा यू-टर्न! Instagramवरील AI इमेज फीचर हटवले
  7. 50MP कॅमेऱ्याचा Ai+ Nova 2 Ultra 5G तब्बल ₹1,900 स्वस्त; ऑफर चुकवू नका!
  8. ChatGPT वापरून स्ट्रीमिंग कंपनीवर सायबर हल्ला; 15 वर्षीय मुलगा अटकेत
  9. 7600mAh बॅटरीसह iQOO 15R झाला आणखी स्वस्त; मिळतेय भन्नाट डील
  10. भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या कायद्याचे केले कौतुक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »