Samsung Galaxy Z TriFold हा एकाच क्राफ्टेड ब्लॅक रंगाच्या पर्यायात उपलब्ध असणार आहे.
Photo Credit: Samsung
Samsung ने सांगितले, Galaxy Z TriFold चीनसह निवडक देशांच्या ऑफलाइन स्टोअर्समध्ये प्रदर्शित होणार
Samsung ने अधिकृतपणे त्यांचा पहिला दोनदा फोल्ड होणारा स्मार्टफोन, Samsung Galaxy Z TriFold सादर केला आहे. या डिव्हाइसमध्ये dual-hinge डिझाइन, मोठा 10-inch inner display आणि फ्लॅगशिप-ग्रेड हार्डवेअर आहे. पोर्टेबिलिटी, प्रीमियम परफॉर्मन्स आणि उत्पादकता या सर्वांमध्ये एकाच डिव्हाइसमध्ये परिपूर्ण बॅलन्स देणार आहे. Galaxy Z TriFold आता मोबाइल वर्क, सर्जनशीलता आणि कनेक्शनसाठी शक्य असलेल्या सीमांचा विस्तार करते. हे मॉडेल प्रथम या महिन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि नंतर ग्लोबल मार्केट मध्ये विस्तारित होईल.
Samsung ने अद्याप Galaxy Z TriFold ची किंमत जाहीर केलेली नाही. पण कंपनीने पुष्टी केली आहे की दक्षिण कोरियामध्ये विक्री 12 डिसेंबरपासून सुरू होईल. देशांतर्गत लाँच झाल्यानंतर, हा हँडसेट चीन, तैवान, सिंगापूर, युएई आणि अमेरिकेमध्येही उपलब्ध होईल. Samsung ने असेही म्हटले आहे की Galaxy Z TriFold या प्रदेशांमधील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये प्रदर्शित केला जाईल. कंपनी ग्राहकांना या डिव्हाइसचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास अनुमती देईल. हा एकाच क्राफ्टेड ब्लॅक रंगाच्या पर्यायात उपलब्ध असेल.
Galaxy Z TriFold हा Android 16 आधारित OneUI 8 वर चालतो आणि ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. त्याचे वेगळे फीचर म्हणजे त्याचा विस्तृत 10 इंच QXGA+ (2,160 × 1,584 pixels) Dynamic AMOLED 2X इनर डिस्प्ले, जो 269 ppi, 1600 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि पूर्ण DCI-P3 कलर कव्हरेज देतो. बाहेरून, फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ (1,080 × 2,520 pixels) Dynamic AMOLED 2X कव्हर स्क्रीन आहे.
Samsung ने प्रगत आर्मर अॅल्युमिनियमसह जोडलेली टायटॅनियम हिंग सिस्टम वापरली आहे. फोनमध्ये दोन वेगवेगळ्या आकाराचे हिंज आणि चांगल्या टिकाऊपणा आणि गुळगुळीत फोल्डिंगसाठी ड्युअल-रेल स्ट्रक्चर आहे.
Galaxy Z TriFold मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा आहे जो OIS सह येतो,12 MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे जो 102 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह येतो आणि 10 MP टेलिफोटो लेन्स आहे जो OIS आणि 30x पर्यंत डिजिटल झूम देतो. सेल्फीसाठी, सॅमसंगने दोन 10 MP सेल्फी कॅमेरे समाविष्ट केले आहेत. एक कव्हर स्क्रीनवर आणि दुसरा आतील डिस्प्लेवर असणार आहे.
जाहिरात
जाहिरात