मसंग फोनच्या यूएस व्हेरिएंटमध्ये हे व्हॅल्यू 1 वर सेट केले जाते असे म्हटले जाते, तर इतर सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या हँडसेटमध्ये बूटलोडर अनलॉक केला जाऊ शकतो.
Photo Credit: Samsung
गॅलेक्सी झेड फ्लिप ७ वरील स्थिर वन यूआय ८ बिल्डमध्ये हे पुरावे सापडले (चित्रात)
येत्या One UI 8 अपडेटसह Samsung त्यांच्या स्मार्टफोन्सवरील कंट्रोल अधिक कडक करत आहे. XDA डेव्हलपर्सच्या एका contributor च्या अहवालानुसार, कंपनी विविध प्रकारच्या डिव्हाइसेसमध्ये बूटलोडर अनलॉकिंग डिसेबल करत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामध्ये पूर्वी त्याला सपोर्ट करणारे international models देखील समाविष्ट आहेत. अमेरिकेतील सॅमसंग फोन डेव्हलपर ऑप्शन्समध्ये OEM अनलॉकिंग टॉगल देत नव्हते, ज्यामुळे यूजर त्यांचे बूटलोडर अनलॉक करू शकत नव्हते. पण, नव्या One UI 8 beta firmware मध्ये समोर आलेला बदल सूचित करतो की ही मर्यादा आता जागतिक स्तरावर वाढवली जाऊ शकते. बूटलोडर कॉन्फिगरेशनमधील ओळ - androidboot.other.locked=1 सध्या नवी आहे. ज्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.बूटलोडर कॉन्फिगरेशनमधील नवीन ओळ OEM अनलॉक टॉगल पूर्णपणे डिसेबल करते. बूटलोडर अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेली सुरुवातीची पायरी ब्लॉक करते. जेव्हा equals value 0 (Zero) वर सेट केली जाते, तेव्हा yuujar बूटलोडर अनलॉक करू शकतो असे म्हटले जाते. जेव्हा व्हॅल्यू 1 वर सेट केली जाते तेव्हा असे करणे शक्य नसते. आतापर्यंत, सॅमसंग फोनच्या यूएस व्हेरिएंटमध्ये हे व्हॅल्यू 1 वर सेट केले जाते असे म्हटले जाते, तर इतर सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या हँडसेटमध्ये बूटलोडर अनलॉक केला जाऊ शकतो.
सुरुवातीच्या यूजर्सच्या अहवालांवरून असे दिसून येते की One UI 8 beta वर चालणार्या Galaxy Z Fold 7 सारख्या डिव्हाइसेसमध्ये डेव्हलपर ऑप्शन्समध्ये OEM अनलॉकचा पर्याय दिसत नाही. अमेरिकेबाहेरील यूजर्सनेही याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे हे निर्बंध आता रिजन स्पेसिफिक नसतील असे सूचित होते. काहींचा असा अंदाज आहे की ही बीटामधील त्रुटी असू शकते, परंतु सॅमसंगने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
बूटलोडर अनलॉक केल्याने यूजर्सना कस्टम ROM सेटअप करण्याची, त्यांचे डिव्हाइस रूट करण्याची आणि सखोल सॉफ्टवेअर कस्टमायझेशन करण्याची परवानगी मिळते. जर हे पाऊल कायमचे असेल तर, बूटलोडर अॅक्सेसवर अवलंबून असलेल्या डेव्हलपर्स आणि पॉवर यूजर्ससाठी एक धक्का असेल.
सध्या, ज्या फोनमध्ये One UI 8 अपडेट केलेले नाही त्यांच्याकडे बूटलोडर अनलॉक करण्याचा पर्याय अजूनही आहे. पण, अपडेट रोल आउट झाल्यानंतर किंवा नवीन मॉडेल्समध्ये One UI 8 आणि Android 16 सोबत आल्यावर, हे स्वातंत्र्य पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकते. सॅमसंगने अद्याप पॉलिसी मध्ये बदल करण्याबाबत माहिती दिलेली नाही. त्यासाठी आता कंपनीकडून अपडेट किंवा स्पष्टीकरणाची वाट पहावी लागणार आहे.
जाहिरात
जाहिरात