आता फ्लिप स्मार्टफोन होणार स्वस्त कारण येत आहे, Tecno Phantom V Flip 2

Tecno Phantom V flip 2 ची भारतातील किंमत ही 55,000 ते 60,000 च्या दरम्यान असू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आता फ्लिप स्मार्टफोन होणार स्वस्त कारण येत आहे, Tecno Phantom V Flip 2
महत्वाचे मुद्दे
  • Tecno Phantom V Flip 2 मध्ये 6.9 इंचाचा प्राथमिक डिस्प्ले दिलेला आहे.
  • हा स्मार्टफोन Android 14 चे समर्थन करू शकतो.
  • Tecno Phantom V Flip 2 हा Phantom V चा कॅमेरा सेटअप राखून ठेवेल.
जाहिरात

Tecno ही स्मार्टफोन कंपनी भारतात लवकरच त्यांचा आगामी स्मार्टफोन म्हणजेच Tecno Phantom V flip 2 लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरं सांगायचं तर या स्मार्टफोन बद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नसून फक्त या स्मार्टफोनला मिळालेल्या BIS प्रमाणपत्रामुळे या स्मार्टफोन बाबतच्या चर्चांना उधाण आला आहे. काही ऑनलाईन वेबसाइट वरून या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य किंमत आणि बरीचशी माहिती लिंक झाल्याचे दिसून येत आहे. चला तर मग बघूया Tecno Phantom V flip 2 या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये.

Tecno Phantom V flip 2 ची वैशिष्ट्ये

Tecno Phantom V flip 2 या स्मार्टफोनमध्ये प्राथमिक डिस्प्ले 6.9 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 1.32 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर MediaTek Dimensity 8020 या चिपसेटद्वारे समर्थित आहे. पण असेही म्हंटले जात आहे की अपग्रेड म्हणून MediaTek Dimensity 8050 SoC ह्या प्रोसेसर द्वारे समर्थित बनवला जाऊ शकतो. आणि त्यासोबतच Android 14 OS वर चालण्यासाठी सुसज्ज असणार आहे.

Tecno Phantom V flip 2 या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आलेला असून त्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 64 मेगापिक्सल चा आणि दुसरा कॅमेरा हा 13 मेगापिक्सलचा असून LED फ्लॅश सोबत बसविण्यात आलेला आहे. सेल्फी काढण्यासाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूस 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ही 4000 mAh ची असून दैनंदिन वापरासाठी पुरेशी असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनचे वजन फक्त 196 ग्रॅम असून यामध्ये फेस अनलॉक वैशिष्टय देखील जोडण्यात येणार आहे.

Tecno Phantom V flip 2 हा स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला केव्हा येणार याबाबत कोणतीही माहिती कंपनी किंवा इतर सूत्रांकडून मिळालेली नसून लवकरच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.

Tecno Phantom V flip 2 ची किंमत

Tipster या वेबसाइट द्वारे मिळालेल्या माहितीनुसार Tecno Phantom V flip 2 ची भारतातील किंमत ही 55,000 ते 60,000 च्या दरम्यान असू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्यातरी बाजारात उपलब्ध असलेल्या फिलिप्स स्मार्टफोनच्या तुलनेत Tecno ही कंपनी एक असा स्मार्टफोन लॉन्च करत आहे, जो इतर ब्रँडच्या तुलनेत कमी किंमतीत आणि परवडणारा असेल. सध्यातरी बाजारात फ्लीप स्मार्टफोनचे आकर्षण जास्त असले तरी त्यांच्या महागड्या किंमती हा ग्राहकांसाठी एक अडथळा आहे.

यापूर्वी लॉन्च झालेल्या Tecno च्या Tecno Phantom V flip या स्मार्टफोनची किंमत 54,999 इतकी आहे. त्यामुळे काही विशिष्ट अपग्रेड सोबत थोड्याफार जास्त किमतींमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो.

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फसवणूक मेसेज रोखण्यासाठी TRAI ची नवी सक्ती; व्हेरिएबल प्री-टॅगिंग बंधनकारक
  2. iPhone यूजर्ससाठी खुशखबर! AppleCare+ मध्ये Theft व Loss Protection ची भर
  3. लाँचपूर्वी Amazon वर Realme 15 Lite 5Gचा खुलासा; Dimensity 8000 चिपसेटसह किंमत व स्पेसिफिकेशन्स पहा
  4. Reliance Jio देत आहे ₹35,100 चे Gemini AI 3 सब्सक्रिप्शन मोफत
  5. X ने रोलआउट केली नवी Chat सेवा; एन्क्रिप्टेड DMs आणि प्रायव्हसी फीचर्स मिळणार
  6. POCO F8 Series येतोय 26 नोव्हेंबरला; Pro आणि Ultra चे स्पेसिफिकेशन्स चर्चेत
  7. Realme ची भारतात नवीन P सिरीज स्मार्टफोनची घोषणा; फोनचे फीचर्स आणि किंमत अंदाज काय
  8. OnePlus 15R भारतात लॉन्चसाठी तयार; पहा फोनचे सारे अपडेट्स
  9. Lava Agni 4 चा होम डेमो उपलब्ध, खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी घेऊ शकाल अनुभव
  10. Oppo Find X9 सीरीजच्या किंमतीत वाढ? लॉन्चपूर्वीच लीकने निर्माण केली चर्चा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »