Photo Credit: Vivo
चीनच्या Vivo या स्मार्टफोन कंपनीने नुकत्याच त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या लॉन्च होण्याबद्दल आपल्या X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाऊंट वरून घोषणा केली आहे. यामध्ये एक पोस्ट शेअर करत कंपनीने आपला आगामी स्मार्टफोन Vivo T3 Ultra 5G हा कोणत्या तारखेला लॉन्च होणार याची स्पष्ट माहिती दिली आहे. या पोस्ट वरूनच हा स्मार्टफोन भारतात केव्हा लॉन्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चला तर पाहुयात, काय आहेत या Vivo T3 Ultra 5G ची वैशिष्ट्ये आणि लॉन्च तारीख
Vivo T3 Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये 1.5K रिझोल्यूशन असलेला आणि 120Hz रिफ्रेश रेटचा 6.78 इंचाचा 3D वक्र AMOLED डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या स्मार्ट फोन च्या डिस्प्ले पॅनलची तेजस्विता 4500 nits पर्यंत देखील वाढवता येऊ शकते आणि समर्थित सामग्रीसाठी HDR10+ पाहण्यास समर्थन देण्यास सक्षम आहे.
पाणी आणि धूळ यांचा प्रतिकार करण्यासाठी या स्मार्टफोनला IP68 रेटिंग देखील प्राप्त झाले आहे. त्यासोबतच या रेतींगच्या आधारावर कंपनीने असे देखील म्हटले आहे की Vivo T3 Ultra 5G हा स्मार्टफोन 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटांपर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता बुडवता येऊ शकतो. यामुळे तुम्हाला जर पाण्याखाली विडियो शूटिंग करायचे असेल तर हा स्मार्टफोन नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
Vivo T3 Ultra 5G हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर ने समर्थित असणार आहे. या स्मार्टफोनची रॅम क्षमता 8 GB ते 12 GB पर्यंत देण्यात येणार आहे. तर या स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता ही कमाल 256 GB पर्यंत उपलब्ध असून मायक्रो एसडी स्लॉट सोबत ही क्षमता 1 TB पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची बॅटरी असून ती 80W फास्ट वायर्ड चार्जिंगचे समर्थन करते.
Vivo T3 Ultra 5G या स्मार्टफोनच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या टिझर वरून लक्षात येते की कंपनीकडून हा स्मार्टफोन भारतात 12 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. त्यासोबतच लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट इंडियाच्या वेबसाईट सोबतच Vivo इंडियाच्या अधिकृत वेबसाईट आणि स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची किंमत किंवा रॅम आणि स्टोरेज क्षमतेच्या आधारावर या स्मार्टफोनचे किती प्रकार पडतील व त्यांची किंमत काय असेल हे अजूनही कंपनीकडून स्पष्ट झालेले नाही.
जाहिरात
जाहिरात