Photo Credit: Vivo
Vivo T4x 5G ने Vivo T3x 5G ला यशस्वी होण्याची अपेक्षा आहे
Vivo T4x 5G हा Bureau of Indian Standards वर पूर्वी स्पॉट झाला होता त्यामुळे आता लवकरच हा फोन लॉन्च होण्याचा अंदाज आहे. आता या फोन लॉन्चच्या टाईमलाईन आणि काही स्पेसिफिकेशन बद्दलची माहिती समोर येत आहे. The Vivo T4x 5G हा Vivo T3x 5G,च्या पुढील स्मार्टफोन आहे. जो भारतात एप्रिल 2024 मध्ये आला होता त्यामध्ये Snapdragon 6 Gen 1 SoC आहे. Vivo कडून नवा lower midrange T-series फोन आहे.
MySmartPrice report च्या अंदाजानुसार Vivo T4x 5G भारतामध्ये मार्च 2025 मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. अद्याप ठोस तारीख सांगण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार हा फोन 15 हजार च्या रेंज मध्ये असू शकतो. यापूर्वीच्या फोन प्रमाणे असणार आहे.
Vivo T4x 5G मध्ये 6,500mAh battery आहे जी या सेंगमेंट मधील फोनमधील सर्वाधिक क्षमतेची बॅटरी आहे. Vivo T3x 5G मध्ये 6,000mAh battery आहे. भारतामध्ये हा फोन Pronto Purple आणि Marine Blue या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Vivo T4x 5G चं डिझाईन पाहता त्यामध्ये Dynamic Light feature असण्याचा अंदाज आहे. वेगवेगळ्या नोटिफिकेशन साठी वेगवेगळे लाईट्स दिसणार आहेत. अद्याप फोनबद्दल अन्य कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कोणत्याही सूचीने या डिव्हाइसच्या हार्डवेअर वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. Vivo T4x 5G ची इतर वैशिष्ट्ये अद्याप समोर आली नाही. पण तो Vivo T3x 5G चे उत्तराधिकारी असणार असल्याने, आम्ही अपेक्षा करू शकतो की डिव्हाइसमध्ये थोडेसे अपग्रेड केलेले हार्डवेअर असेल जे त्याच विभागातील आहे.
Vivo T3x 5G ची किंमत वर्षाच्या सुरूवातीला कमी झाली आहे. हा फोन Rs. 12,499, Rs. 13,999 आणि Rs. 15 ,49 मध्ये अनुक्रमे 4GB + 128GB, 6GB + 128GB, आणि 8GB + 128GB,मध्ये उपलब्ध आहे. फोन लॉन्च झाला तेव्हा 13,499 , 14,999 आणि 16499 रूपयांमध्ये लॉन्च झाला होता. हा हॅन्डसेट Crimson Bliss, Celestial Green, आणि Sapphire Blue रंगामध्ये स्मार्ट फोन उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात