चला बघुया, काय आहेत Vivo V40 आणि Vivo V40 pro ची वैशिष्ट्ये

चला बघुया, काय आहेत Vivo V40 आणि Vivo V40 pro ची वैशिष्ट्ये
महत्वाचे मुद्दे
  • Vivo घेऊन आला आहे, सेल्फी काढण्यासाठी 50 मेगापिक्सल चा कॅमेरा.
  • Vivo V40 सीरिजचे स्मार्टफोन्स 5500 mAh सोबत दिवसभर वापरता येणार.
  • Vivo V40 आणि Vivo V40 pro मध्ये आहेत, 50 मेगापिक्सलचे कॅमेरे.
जाहिरात
मित्रांनो मार्च २०२४ मध्येच Vivo ने Vivo V30 आणि Vivo V30 pro हे स्मार्टफोन्स प्रक्षेपित केले आणि त्यानंतर Vivo च्या वापरकर्त्यांना उत्सुकता लागली आहे, ह्या सिरिजच्या पुढच्या म्हणजेच Vivo V40 आणि Vivo V40 pro भारतात केव्हा प्रक्षेपित होणार ह्याची. युरोपच्या बाजारपेठांमध्ये हे स्मार्टफोन आधीच उपलब्ध असल्याने भारतात ह्या स्मार्टफोनच्या प्रक्षेपणा संदर्भात बऱ्याचशा अफवा पसरल्या आहेत. म्हणूनच आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, Vivo V40 सिरीजच्या प्रक्षेपणाची तारीख आणि वैशिष्ट्ये. 

प्रक्षेपणाची तारीख

Vivo V40 सिरीज चे पुढचे स्मार्टफोन्स म्हणजेच Vivo V40 आणि Vivo V40 pro भारतात केव्हा प्रक्षेपित होणार ह्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण कंपनी कडून देण्यात आलेले नाही आहे. पण तरीही My Smart Price कडून प्रदर्शित झालेल्या एका अहवालानुसार ह्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात हे दोन्ही स्मार्टफोन प्रक्षेपित केले जाऊ शकतात.

Vivo V40 आणि Vivo V40 pro ची वैशिष्ट्ये

Vivo V40 चा डिस्प्ले हा 6.78 इंच असून FHD, 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 2800 × 1260 पिक्सेलचं जबरदस्त रेझोल्युशन तुम्हाला कमालीची दृश्ये दाखविण्या सोबतच गेमिंगचा अविस्मरणीय अनुभव देतो. 

डिस्प्ले नंतर Vivo V40 ची बॅटरी ही 5500 mAh ची असून 44 व्हॅटच्या जलद चार्जिंगचे समर्थन करते. ह्याचे दोन मुख्य फायदे असे आहेत की, जलद चार्जिंग मुळे वीज कमी खर्च होते आणि दिवसभर बॅटरी संपण्याची चिंता देखील नाही.

ह्यानंतर सर्वांत महत्त्वाचा आहे तो म्हणजे कॅमेरा. Vivo V40 सीरिज चे कॅमेरा हा जगप्रसिद्ध ऑप्टिक्स ब्रँड Ziess च्या सहयोगाने बनवलेला आहे. फक्त रियर कॅमेरा नाही तर सेल्फी कॅमेरा सुद्धा. हे दोन्हीही कॅमेरे 50 मेगापिक्सल चे ठेवण्यात आले आहेत. आता फोटोग्राफी सुद्धा होणार आणि महगड्या कॅमेराची गरज सुद्धा नाही. 

Vivo V40 चा प्रोसेसर Snapdragon 7, Gen 3, SoC आणि Adreno 720 GPU द्वारे समर्थित आहे. जो जलद गतीने स्मार्टफोन वापरण्यास आणि एका वेळी अनेक कार्य करण्यास समर्थ आहे.

मित्रांनो तुम्ही ही Vivo V40 विकत घेण्यासाठी उत्सुक आहात का, तर आमच्या पुढच्या अपडेट्स साठी आम्हाला नक्की फॉलो करा.
 
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »