Photo Credit: Vivo
Vivo X200 सीरीज चीन मध्ये MediaTek Dimensity 9400 SoC सह लॉन्च होणार असल्याची माहिती Vivo कडून देण्यात आली आहे. MediaTek flagship mobile chipset ची घोषणा झाल्यानंतर ही नव्या स्मार्टफोनची देखील लगेजच माहिती देण्यात आली आहे. या फोन मध्ये 3nm process असणार आहे. यापूर्वीच्या फोनपेक्षा हा 40% अधिक power-efficient असल्याची माहिती देण्यात आली आहे. one Arm Cortex-X925 core यामध्ये असून 3.62GHz वर तो चालणार आहे. Vivo प्रमाणेच Oppo कडून देखील Dimensity 9400 SoC वर चालणार्या फ्लॅगशीप फोनची माहिती देण्यात आली आहे.
Vivo X200, Vivo X200 Pro, आणि Vivo X200 Pro Mini हे स्मार्टफोन 14 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 7 वाजता (4:30pm IST) पहिल्यांदा लोकांसमोर येणार आहेत. याबाबतचे अपडेट्स Weibo handle वरून देण्यात आले आहेत.
Vivo X200 आणि Vivo X200 Pro हे स्मार्टफोन चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहेत. Midnight Black, Moonlight White, Sapphire Blue, आणि Titanium हे चार रंग असणार आहेत. Vivo X200 Pro Mini हा फोन काळा, गुलाबी, हिरवा आणि पांढरा रंगामध्ये दिसणार आहे. अद्याप या रंगांबद्दल अधिकृत नावाची माहिती समोर आलेली नाही.
Vivo X200 series चे स्मार्टफोन हे Dimensity 9400 chipset वर चालणारे पहिले स्मार्टफोन असणार आहेत. SoC TSMC च्या 3nm प्रक्रियेवर आधारित आहे आणि ऑन-डिव्हाइस AI फीचर्स आणि नवीन ISP आणि NPU सह येतो. यामध्ये Cortex-X925 आहे जो 3.63 GHz वर चालतो. 3 Cortex-X4 units आहेत त्यामध्ये 3.3 GHz maximum frequency आहे.
MediaTek चा दावा आहे की नवी चीपसेट MediaTek's Dimensity 9300 च्या तुलनेत 35% वेगवान आहे. ती single-core performance आणि 28% वेगवान ulti-core performance देणारी आहे. तर 40% अधिक power-efficient आहे. 80% अधिक large language model prompt performance देणारी आहे.
Vivo X200 series व्यतिरिक्त MediaTek ची नवी हाय एंड चीप ही Oppo Find X8 seriesमध्येही दिसणार आहे.
Vivo X200 ची किंमत सुमारे CNY 3,999 म्हणजेच अंदाजए 48 हजार भारतीय रूपयांसह सुरू होणार आहे. त्यामध्ये फोन 12GB + 256GB या व्हेरिएंटचा असणार आहे. Vivo X200 Pro Mini हा CNY 4,599 चा असणार आहे. जो 12GB + 256GB व्हेरिएंट असणार आहे. Vivo X200 Pro हा CNY 5,199 चा असणार आहे जो 16GB + 256GB variant चा असणार आहे.
जाहिरात
जाहिरात