Photo Credit: Vivo
चीन मध्ये या आठवड्याच्या सुरूवातीला Vivo X200 series मधील 3 मॉडेल Vivo X200, X200 Pro, आणि X200 Pro Mini लॉन्च करण्यात आले आहेत. आता हे फोन भारतामध्ये कधी लॉन्च होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही पण वर्ष अखेरीपर्यंत हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. Vivo X200 series मधील तिन्ही मॉडेल मध्ये नवी MediaTek Dimensity 9400 SoC असणार आहे. तसेच जर्मन ऑप्टिक्स ब्रॅन्ड Zeiss सोबत को इंजिनियअर केलेली कॅमेरा सिस्टिम आहे.
91Mobiles च्या माहितीनुसार, Vivo X200 series भारतामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. Vivo X100 आणि Vivo X100 Pro भारतामध्ये या वर्षी जानेवरी महिन्यात लॉन्च झाली आहे. चीन मध्ये हे फोन नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च झाले होते.
Vivo X200 नुकताच चीन मध्ये लॉन्च झाला आहे. त्याच्या किंमती चीन मध्ये CNY 4,300 पासून सुरू होत आहेत. भारतीय रूपयांमध्ये हे स्मार्टफोन 51 हजारांपासून सुरू होतात. बेस मॉडेल 12GB + 256GB storage सह आहे. Vivo X200 Pro ची किंमत CNY 5,999 आहे जी भारतीय रूपयांमध्ये 63 हजार आहे. आणि Vivo X200 Pro Mini ची किंमत CNY 4,699 आहे. भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत 56 हजारांपासून सुरू होते. ही किंमत बेस मॉडेलची आहे.
Vivo's X200 series चे फीचर्स पाहता या तिन्ही फोन्स मध्ये MediaTek Dimensity 9400 SoC आहे. तसेच ट्रीपल रेअर कॅमेरा सेट अप आहेत. यामध्ये 50-megapixel primary camera आहे. या स्मार्टफोन मध्ये पहिल्यांदा next-generation MediaTek chipset वापरली जाणार आहे. Zeiss चं तंत्रज्ञान असलेले कॅमेरे यामध्ये आहेत. ते Origin OS 5 वर चालणार आहेत.
vanilla Vivo X200 मध्ये 5,800mAh बॅटरी आहे. तर फोनला चार्जिंग करण्यासाठी 90W चार्जर लागणार आहे. Vivo X200 Pro आणि X200 Pro Mini मध्ये 6,000mAh आणि 5,800mAh बॅटरी आहे. त्यांनाही 90W wired charging support आहे.
जाहिरात
जाहिरात