Photo Credit: Vivo
Vivo X200 Ultra मध्ये 6,000mAh बॅटरी असेल.
Vivo X200 Ultra चीन मध्ये एप्रिल 21 दिवशी लॉन्च केला जाणार आहे. त्यासोबतच Vivo X200s देखील येणार आहे. या फोनच्या फॉर्मल रिव्हिल पूर्वी Vivo ने Weibo वर फोनचे काही टीझर शेअर केले आहेत, त्यामधून फोनच्या कॅमेर्याबद्दल काही माहिती समोर येत आहे. Vivo X200 Ultra मध्ये Sony चा LYT-818 sensor वापरला आहे. हा primary आणि ultra wide angle cameras साठी वापरला जाणार आहे. हा Photography Kit accessory ला देखील सपोर्ट करतो. Vivo X200 Ultra हा 2K OLED display आणि 6,000mAh battery सोबत पाठवला जाणार आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite chipset आहे.Vivo कडून Weibo वर टाकण्यात आलेल्या टीझर नुसार,Vivo X200 Ultra च्या फीचर्सचा अंदाज येत आहे. या आगामी स्मार्टफोन मध्ये Zeiss-branded camera setup आहे. ज्यात 14mm ultra wide angle sensor, 35mm primary camera आणि 85mm Zeiss APO lens आहे. 14mm ultra-wide angle sensor आणि 35mm main camera हा 1/1.28-inch Sony LYT-818 sensor चा वापर करत आहे. कॅमेर्यामध्ये optical image stabilisation (OIS) support आहे.
Vivo X100 Ultra पेक्षा Vivo X200 Ultra मध्ये असलेला 85mm telephoto sensor हा 38% अधिक light sensitive आहे. कॅमेरा युनिटचा विचार करता Vivo V3+ आणि VS1 imaging chips, चांगली कामगिरी करत आहे. VS1 AI image signal processor मुळे 80 (trillion operations per second) of computing power देते.
Vivo कडून अनेक कॅमेरा सेटअप टाकण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक सेन्सरच्या महत्त्वपूर्ण गोष्टीची माहिती दिली आहे. हा फोन 4K videos 120fps तर 4K 60fps मध्ये 10-bit log शूट करू शकतो. यामध्ये DCG HDR, आणि camera unit असल्याने ते AI-based features आहेत. हा हॅन्डसेट optional Photography Kit सोबत दिला जाणार आहे.
Vivo X200 Ultra मध्ये 2K OLED Zeiss branded display आणि Armour glass protection आहे. सोबत फोनमध्ये 6,000mAh battery आणि 40W wireless, 90W wired charging आहेत. फोन जाडीला 8.69mm आहे. यामध्ये ultrasonic 3D fingerprint sensor हा बायोमेट्रिक साठी देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 8 Elite processor वर चालेल.
जाहिरात
जाहिरात