Vivo Y18i, Vivo ने केला गुपचूप लॉन्च, बघुया काय आहेत वैशिष्ट्ये

Vivo ने Y मालिकेमधला त्यांचा अजून एक स्मार्टफोन म्हणजेच Vivo Y18i लॉन्च केला आहे.

Vivo Y18i, Vivo ने केला गुपचूप लॉन्च, बघुया काय आहेत वैशिष्ट्ये

Photo Credit: Vivo

महत्वाचे मुद्दे
  • Vivo Y18i Android 14-आधारित Funtouch OS 14 ह्यावर चालणार आहे.
  • Vivo Y18i ह्या स्मार्टफोनमध्ये IP54-रेट केलेले बिल्ड आहे.
  • Vivo Y18i मध्ये दोन रियर कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे.
जाहिरात
Vivo ने मे 2024 मध्ये Vivo Y18 आणि Vivo Y18e हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते. पण विवोच्या चाहत्यांना ह्याची काहीच कल्पनाही नसताना Vivo ने Y मालिकेमधला त्यांचा अजून एक स्मार्टफोन म्हणजेच Vivo Y18i लॉन्च केला आहे. एक एन्ट्री स्तरावरचा स्मार्टफोन म्हणून ह्या स्मार्टफोनला अगदी परवडेल अशा किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आणि आज आम्ही तुम्हाला ह्या स्मार्टफोनबाबत सर्व आवश्यक माहिती देणार आहोत. चला तर मग बघुया, काय विशेष असणार आहे Vivo च्या ह्या नुकत्याच लॉन्च झालेल्या Vivo Y18i मध्ये.

Vivo Y18i ची किंमत आणि उपलब्धता

एक एन्ट्री स्तरावरचा स्मार्टफोन असल्याने ह्यामध्ये खूप जास्त प्रकार ठेवण्यात आलेले नाहीत. हा एकमेव मॉडेल असून त्याची रॅम ही 4GB आणि 64GB आणि 128GB स्टोरेज सोबत हा स्मार्टफोन स्पेस ब्लॅक आणि जेम ग्रीन अशा दोन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या वेबसाइट्स सोबत Vivo च्या अधिकृत वेबसाईट आणि Vivo च्या स्टोअर्स मध्ये सुद्धा खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.

Vivo Y18i ची वैशिष्ट्ये

Vivo Y18i चा डिस्प्ले जर आपण पहिला तर तो, 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनचा प्रोसेसर Octa-Core UNISOC T612 12nm SoC द्वारे समर्थित आहे. ह्या स्मार्टफोनची तेजस्विता 840 nits पर्यंत वाढवता येऊ शकते.

4GB रॅम च्या क्षमतेसोबत 64 GB आणि 128 GB ची स्टोरेज क्षमता असलेले दोन मॉडेल्स ह्या स्मार्टफोन मध्ये मिळतात. मायक्रोएसडी सोबत ह्या स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. अँड्रॉइड 14 वरच आधारित असलेल्या funtouch OS 14 चे Vivo Y18i समर्थन करतो. 

स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 13 मेगापिक्सलचा असून दुसरा कॅमेरा हा 0.08 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी काढण्यासाठी समोरील कॅमेरा 5 मेगापिक्सलचा देण्यात आलेला आहे. 

ह्या स्मार्टफोनचे वजन फक्त 185 ग्रॅम असून हा धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. तरीसुद्धा हा फोन वापरताना तुम्हाला तो जाणून बुजून पाण्यात भिजवण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ह्या स्मार्टफोनला पूर्णपणे पाणी प्रतिरोधक समजता येणार नाही आणि पाण्याच्या आतील फोटोज किंवा विडिओ घेण्यासाठी तो वापरता येणार नाही. 

Vivo Y18i मध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली असून ती 15 वॅट च्या चार्गिंगचे समर्थन करते. ह्यामुळे बॅटरी फक्त लवकर चार्ज नाही होत तर चार्जिंग लवकर न संपता जास्त काळापर्यंत टिकून राहते. त्यामुळे सकाळी चार्ज केलेला फोन संपूर्ण दिवसभर आरामात चालू शकतो.
Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Pixel आता आणखी स्मार्ट! Google ने आणले नवे AI फीचर्स
  2. Galaxy S26+ लॉन्चपूर्वीच चर्चेत, डिझाइन आणि फीचर्स पाहून चाहते झाले उत्सुक
  3. Apple चा पुढील HomePod Mini आणखी स्मार्ट झाला, जाणून घ्या काय फीचर्स
  4. 2025 Samsung टीव्हीमध्ये Vision AI Companion, यूजर्ससाठी नवे स्मार्ट फिचर्स
  5. Nothing Phone 3a Lite भारतात लवकरच होणार लॉन्च, कलर ऑप्शन्समध्ये नवा ट्विस्ट
  6. Lava Agni 4 चे फीचर्स ; भारतात लवकरच लाँच होणार नवा स्मार्टफोन
  7. लाँचपूर्वी लीक झाले Galaxy S26, S26+ चे रेंडर्स; कॅमेरा डिझाइनमध्ये मोठा बदल
  8. Airtel कडून Rs 189 व्हॉईस पॅक हटवला; आता Rs 199 पासूनच रिचार्ज
  9. Vivo ने चीनमध्ये सादर केला Y500 Pro, मागील मॉडेलपेक्षा मिळणार जबरदस्त अपग्रेड्स
  10. Samsung Galaxy फोन वापरताय? हॅकर्सनी तुमचा डेटा चोरल्याची शक्यता
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »