Photo Credit: Vivo
Vivo कडून Vivo Y300 5G ची भारतामधील लॉन्च डेट जारी केली आहे. चायनीज स्मार्टफोन ब्रॅन्डने आगामी Y series phone ची पहिली झलक समोर आणली आहे. वेबसाईट वर आता लॅन्डिंग पेज देखील तयार करण्यात आले आहे. यामध्ये 3 रंग उपलब्ध असणार आहेत. Vivo Y300 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा असणार आहे. हा फोन Vivo Y200 च्या पुढील फोन आहे. हा हॅन्ड्सेट Vivo V40 Lite रिब्रॅन्डेड फोन असून तो जगात काही निवडक ठिकाणी सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता.
X वर दिलेल्या माहितीनुसार, Vivo India ने Vivo Y300 5G भारतामध्ये 21 नोव्हेंबर दिवशी समोर येणार असल्याचं सांगितलं आहे. पोस्ट नुसार, लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे तर हा फोन काळा, हिरवा आणि सिल्वर रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
Vivo कडून वेबसाईट वर Vivo Y300 5G साठी एक खास लॅन्डिंग पेज बनवण्यात आलं असून आता त्याच्या डिझाईन ची झलक देखील समोर आली आहे. हा व्हर्टिकल ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा स्मार्टफोन आहे. कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लशची व्यवस्था या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये डेब्यू झालेल्या Vivo V40 Lite सारखीच आहे. Vivo Y300 5G च्या टेस्ड शेड्स देखील Vivo V40 Lite 5G च्या डायनॅमिक ब्लॅक आणि टायटॅनियम सिल्व्हर कलर वे सारख्या दिसतात.
Vivo V40 Lite 5G हा इंडोनेशिया मध्ये IDR 4,299,000 म्हणजे भारतीय रूपयाप्रमाणे 23,700 रूपयाला लॉन्च झाला आहे. ही किंमत 8 जीबी आणि 256 जीबी ऑप्शन सह आहे. यामध्ये 6.67 इंच full-HD+ (1,080 x 2,400 pixels) AMOLED display आणि 120Hz refresh rate सह असणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 SoC आहे जी 12GB of LPDDR4X RAM सोबत जोडलेली असणार आहे. या फोनमध्ये 512GB of UFS 2.2 onboard storage आहे.
हॅन्डसेट मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आहे. त्यामध्ये 50-megapixel Sony IMX882 primary sensor आणि 8-megapixel ultrawide shooter आहे. Vivo V40 Lite 5G मध्ये 32-megapixel फ्रंट कॅमेरा आहे. तर 5,000mAh बॅटरी आहे. हा फोन 80W wired fast charging support सह आहे.
Vivo Y300 5G मध्ये हेच स्पेसिफिकेशन अपेक्षित आहे. आता भारतात पुढील आठवड्यात हा फोन येईल तेव्हा चित्र स्पष्ट होणार आहे.
जाहिरात
जाहिरात