Wobble One हा 12 डिसेंबरपासून Amazon.in आणि मुख्य रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी खुला असणार आहे.
Photo Credit: Wobble
ट्रिपल कॅमेरा आणि OISमुळे फोटो-व्हिडिओ अधिक स्थिर, स्पष्ट मिळणार आहेत
Wobble या Indkal Technologies च्या मालकीच्या ब्रॅन्डने Wobble One,हा त्यांच्या कंपनीचा पहिला वहिला स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. 19 नोव्हेंबरला त्याचा भव्य सोहळा नवी दिल्ली मध्ये पार पडला आहे. Indkal ने OEM आधारित उत्पादन मॉडेल स्वीकारले आहे आणि आउटसोर्स केलेल्या व्यवस्थेअंतर्गत Wobble One ची निर्मिती करण्याची शक्यता आहे. Wobble One हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो पूर्णपणे भारतात बनवला गेला आहे. तो स्पर्धात्मक मिड रेंज सेगमेंट, डिझाइन, कामगिरी आणि फीचर्सचा समतोल साधण्यासाठी देखील वापरला जातो.Wobble One हा Mythic White, Eclipse Black, आणि Odyssey Blue रंगामध्ये येतो. 8GB + 128GB मॉडेलची किंमत Rs. 22,000 आहे. तर हा स्मार्टफोन 8GB + 256GB, आणि 12GB + 256GB व्हेरिएंटमध्ये येतो. हे 12 डिसेंबरपासून Amazon.in आणि मुख्य रिटेल चॅनेलवरून उपलब्ध होईल.
Wobble One फोनचा डिस्प्ले 6.67-inch चा असून त्यामध्ये Full HD+ AMOLED display, 120Hz refresh rate, Dolby Vision चा समावेश आहे. जो stunning visuals, vibrant colours आणि fluid motion ला टिपतो. फोनमध्ये 2.6GHz Octa Core MediaTek Dimensity 7400 4nm प्रोसेसरचा समावेश आहे. हा ड्युअल सीम फोन आहे. तर फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे त्यामध्ये 50MP camera with Sony LYT-600 sensor, 8MP ultra-wide camera, 2MP macro camera चा समावेश आहे. ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन असल्याने फोटो आणि व्हिडिओंमधील अस्पष्टता कमी करण्यास मदत होणार आहे. दरम्यान फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे. 7.8mm जाडीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी समाविष्ट आहे.एकदा चार्ज केल्यानंतर 47 तास कॉलिंग, 24 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 22 दिवसांचा स्टँडबाय बॅकअप मिळतो असा दावा करण्यात आला आहे. फोनमध्ये In-display fingerprint sensor समाविष्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ax (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.4, GPS/GLONASS/ Beidou, USB Type-C 2.0 चा समावेश आहे.
हा फोन क्लिन, stock Android 15 वर चालतो ज्यामध्ये कोणतेही अनावश्यक अॅप्स नाहीत. चांगल्या कामगिरीसाठी आणि रोजच्या वापरासाठी सुलभतेसाठी त्यात गुगलच्या एआय-आधारित फीचर्सचा देखील समावेश आहे.
जाहिरात
जाहिरात
Xbox Partner Preview Announcements: Raji: Kaliyuga, 007 First Light, Tides of Annihilation and More
YouTube Begins Testing Built-In Chat and Video Sharing Feature on Mobile App
WhatsApp's About Feature Upgraded With Improved Visibility, New Design Inspired by Instagram Notes