Photo Credit: Xiaomi
Xiaomi 15 series चीन मध्ये मंगळवार 29 ऑक्टोबर दिवशी लॉन्च होणार आहे. Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro अशा या दोन फोनचा त्यामध्ये समावेश आहे. हा स्मार्टफोन लाईन अप Qualcomm च्या Snapdragon 8 Elite Chipset सह आहे. Xiaomi 15 Pro या स्मार्टफोनमध्ये 5X telephoto camera आणि 6,100mAh बॅटरी आहे.
चायनीज सोशल मीडीया प्लॅटफॉर्म Weibo,वर अनेक पोस्ट मध्ये Xiaomi च्या Xiaomi 15 Pro मध्ये 6,100mAh बॅटरी आहे. Xiaomi 14 Pro च्या तुलनेत बॅटरीत 38 टक्के सुधारणा आहे. त्या फोनमध्ये 4,880mAh बॅटरी क्षमता होती.
स्मार्टफोन मध्ये 2K micro-curved screen आहे. ज्यात कस्टामाईज्ड luminous M9 material चा वापर करण्यात आला आहे. ज्यात 1.38mm bezels आणि 3,200 nits ब्राईटनेस आहे. या फोनमध्ये light-emitting material असल्याने 10% पॉवर कंझमशन कमी होणार आहे. Xiaomi 15 Pro मॉडेल मध्ये lossless zoom फीचर आहे. टीझर नुसार, दोन्ही फोन मध्ये Leica branding असणार आहे.
Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro मध्ये Snapdragon 8 Elite chipset ही कंपनीच्या HyperCore technology सोबत जोडलेली आहे. या कॉम्बिनेशन मुळे 45% सुधारणा ही फोनच्या कार्यक्षमतेवर होणार आहे. तर पॉवर कंझमशन ही 52% कमी होणार आहे. Xiaomi 15 series मध्ये 59.4 fps असणार आहे.
Xiaomi ने पोस्ट केलेल्या सॅम्पल्स नुसार, 15 Pro मधील कॅमेरा मध्ये अधिक पॉवरफूल Leica optical high-speed lens system आहे आणि अधिक अॅडव्हान्स Xiaomi AISP 2.0 लार्ज स्केल computational photography platform आहे.
रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 15 series च्या किंमती Xiaomi 14 च्या तुलनेत अधिक असणार आहे. बेस मॉडेल CNY 3,999 असणार आहे. भारतीय रूपयांमध्ये तो Rs 47,200असणार आहे. ही किंमतवाढ component cost च्या वाढीमुळे आहे. Xiaomi 15 Pro ला 3C सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि यामुळे फोन 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.
Xiaomi 15 हा जांभळ्या रंगात उपलब्ध असेल, तर Pro ला हिरव्या रंगामध्ये मिळणार आहे.
जाहिरात
जाहिरात