Photo Credit: Xiaomi
Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro हे दोन्ही मोबाईल महिनाखेरी पर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप या फोनच्या अल्ट्रा मॉडलची माहिती देण्यात आलेली नाही. Xiaomi 13 Ultra, 14 Ultra, Xiaomi 15 Ultra हे फोन मात्र 2025 च्या सुरूवातीला येणार आहे. तत्पूर्वी कंपनीकडून Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro येणार आहेत. परंतू त्याच्या अधिकृत घोषणेची अद्यापही प्रतिक्षा आहे. सध्या Xiaomi 15 Ultra च्या लूक बद्दल काही माहिती समोर आलेली आहे.
Smartprix,सोबतच्या असोसिएशन मध्ये Yogesh Brar,ने Xiaomi 15 Ultra चे अपडेट्स दिले आहेत. या आधीच्या फोनप्रमाणेच हा देखील आहे. ज्यात सर्किल्युअर कॅमेरा मॉडेल आहे आतमध्ये चार लेंस आहे पण ठेवण पहिल्या फोनपेक्षा वेगळी आहे.
Leica ब्रँडिंगच्या पुढे कॅमेरा सेन्सर ठेवला आहे, जो मॉड्यूलच्या वरच्या डाव्या बाजूला दिसतो. इतर तीन सेन्सर खाली आडवे आहेत. दोन फ्लॅश LEDs वरच्या बाजूला आडवे आहेत. दरम्यान, Xiaomi लोगो फोनच्या तळाशी डाव्या बाजूला आहे.
रिपोर्ट्सनुसार, अहवालात असे म्हटले आहे की, वरच्या बाजूला उजवीकडे ठेवलेला कॅमेरा, 4.3x ऑप्टिकल झूमसह 200-मेगापिक्सेल Samsung ISOCELL HP9 1/1.4 पेरिस्कोप झूम लेन्स आणि f/2.6 apertureचे आहे. Xiaomi 14 Ultra च्या 50-मेगापिक्सेल कॅमेऱ्याचे हे एक विशेष अपग्रेड आहे.
Xiaomi च्या 15 Ultra मध्ये Primary Camera म्हणून 50-मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर वापरला जातो. हा मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल 2x टेलीफोटो लेन्ससह असेल. समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याचा अंदाज आहे.
Xiaomi 15 Ultra बद्दलच्या चर्चांचा विचार करता यामध्ये 6.7-inch 2K LTPO micro quad-curved डिस्प्ले आहे. ज्यात 120Hz refresh rate आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite chipset आहे आणि HyperOS 2.0 जी Android 15 वर चालणार आहे. या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे. तर फोन 90W wired आणि 80W wireless charging support आहे.
जाहिरात
जाहिरात