Photo Credit: Redmi
Redmi 14R (pictured) arrives as the successor to the Redmi 13R
मागच्याच महिन्यात, Xiaomi या स्मार्टफोन कंपनीने Redmi 14C सादर केला होता आणि आता यावर्षी Redmi 14R 5G अजूनच आधुनिक अशा वैशिष्ट्यांसह चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. विविध वातावरणात रोजच्या वापरासाठी हा स्मार्टफोन व्यावहारिक बनवणे हे या स्मार्टफोनच्या मागील महत्वाचे उद्दिष्ट्य आहे. चला तर मग बघुयात, काय आहेत नव्याने लॉन्च झालेल्या Redmi 14R 5G ची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
Redmi 14R 5G मध्ये 1640 x 720p रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सोबतच 6.88 इंचाचा डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या स्मार्टफोनची तेजस्विता 600 nits पर्यंत वाढविता येऊ शकते.
हा स्मार्टफोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर ने समर्थित आहे. Redmi 14R 5G मध्ये Dimensity 6100+ ही चीप बसविण्यात आली आहे. त्यासोबतच यामध्ये 5160mAh बॅटरी बसविण्यात आली आहे. या ब्रँडने बॉक्समध्ये 10W चा चार्जर देखील समाविष्ट केला आहे, जो फोन 18W जलद चार्जिंगने समर्थित आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत Redmi 14R 5G मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम क्षमता, मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि सिंगल स्पीकर यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित HyperOS ऑपरेटिंग सिस्टमसोबत येतो. सामग्रीवर अवलंबून, याचे वजन 205.39 ग्रॅम ते 212.35 ग्रॅम पर्यंत असू शकते.
स्टोरेजच्या आधारावर या स्मार्टफोनचे एकूण चार प्रकार पडतात त्यासोबतच हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या फिनिशिंग मध्ये आणि निळा, लवेंडर, शेवाळी आणि काळया या चार रंगांमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज प्रकाराची किंमत 13,000 रुपये इतकी आहे. त्यासोबतच 6 GB रॅम प्रकाराची किंमत 17,700 रुपये तर 8 GB रॅम प्रकाराची किंमत 20,100 रुपये इतकी आहे. त्यासोबतच 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज प्रकाराची किंमत 22,500 रुपये इतकी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा स्मार्टफोन जरी लॉन्च झाला असला, तरीसुध्दा हा भारतामध्ये केव्हा उपलब्ध होणार आहे, याबाबत कंपनीने कोणतेही स्पष्ट मत मांडले नाही.
जाहिरात
जाहिरात