Xiomi Mix Fold 4 केव्हा होणार भारतात लॉन्च.

Xiaomi Mix Fold 4 मध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट, LPDDR5x RAM आणि UFS 4.0 स्टोरेज देण्यात येणार आहे.

Xiomi Mix Fold 4 केव्हा होणार भारतात लॉन्च.

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • Xiomi Mix Fold 4 मध्ये असणार 50 आणि 60 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे.
  • Xiomi Mix Fold 4 सोबत लॉन्च होणार Redmi K70 Ultra
  • Xiomi Mix Fold 4 मध्ये आहे, 1TB स्टोरेज ची क्षमता.
जाहिरात
तुम्हाला सुद्धा फ्लिप स्मार्टफोन्स आवडतात का? Samsung, Motorola, Huawei, Oppo, Vivo आणि Honor या सर्वच ब्रँड्स ने आपले फ्लीप फोन बाजारात आणले आहेत. पण एकमेव Xiaomi हाच असा ब्रँड होता ज्याने, फ्लिप स्मार्टफोनच्या शर्यतीत प्रवेश केला नव्हता. पण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अशा शर्यतीत मागे राहणं हे Xiaomi कसं होऊन देऊ शकते. म्हणूनच आपल्या चाहत्यांसाठी Xiaomi ने नुकताच एक पोस्टर लॉन्च केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अन्य प्रॉडक्ट्स सोबतच Xiaomi Mix Fold 4 ह्या स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. चला तर मग बघुयात केव्हा लॉन्च होणार आहे हा फ्लिप फोन, काय आहेत Xiomi Mix Fold 4 ची वैशिष्ट्ये आणि डिझाइन.

Xiomi Mix Fold 4 ची डिझाइन.

Xiomi Mix Fold 4 हा फ्लिप स्मार्टफोन काळा, पांढरा आणि जांभळा अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Xiomi Mix Fold 4 ह्या स्मार्टफोनच्या मागील वरचा संपूर्ण भाग हा कव्हर डिस्प्ले ने व्यापलेला असून ज्यामध्ये उभ्या दोन कॅमेऱ्यासाठी दोन कटआऊट दिलेले आहेत. कव्हर स्क्रीन क्षेत्र काही सॉफ्टवेअर वैशिष्ट्यांसह दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकतात, जे ड्युअल-कॅमेरा सेटअपच्या खाली असलेल्या भागाला सूचना आणि बाकीचा भाग हा वॉलपेपर प्रदर्शित करण्यास वापरले जाऊ शकतात. 

Xiomi Mix Fold 4 ह्या स्मार्टफोन च्या वरच्या बाजूला दोन छिद्रे आहेत, जी मुख्यत्वे मायक्रोफोन आणि IR ब्लास्टर साठी देण्यात आली आहेत. फ्लिप फोनच्या खालच्या बाजूस USB पोर्ट, मायक्रोफोन, सिम स्लॉट आणि स्पीकर देण्यात आला आहे. Xiomi Mix Fold 4 च्या डाव्या बाजूला कोणतेच बटन देण्यात आलेलं नाही आहे, तर उजव्या बाजूलाच पॉवर बटन आणि ध्वनी बटन देण्यात आले आहेत. 

Xiomi Mix Fold 4 ची वैशिष्ट्ये.

 Xiaomi कडून हा स्मार्टफोन अजूनही लॉन्च झाला नसला तरीही, त्याची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली आहे. Xiaomi Mix Fold 4 मध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट, LPDDR5 आणि RAM त्यासोबतच UFS 4.0 स्टोरेज देण्यात येणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये उष्णता नष्ट करण्यासाठी 3D व्हेपर चेंबर कुलिंग युनिट बसविण्यात येणार आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी ही 4780 mAh ची असेल त्यासोबत ह्या फोनमधील लेन्स ह्या Leica ऑप्टिकसह तयार केलेल्या आहेत. 

Xiomi Mix Fold 4 हा स्मार्टफोन, 12GB आणि 16GB रॅम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार असून ह्याची स्टोरेज क्षमता ही 1 TB पर्यंत देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 67W च्या जलद चार्जिंगचे समर्थन ही करतो. Xiomi Mix Fold 4 HyperOS-आधारित Android 14 वर आधारित असेल अशी अपेक्षा आहे.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »