Photo Credit: Apple
Apple कंपनीच्या सोमवारी पार पडलेल्या GlowTime या कार्यक्रमात त्यांनी आपले नवीनतम स्मार्टफोन्स, AirPods आणि Apple Watch Series 10 लॉन्च केली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ॲपल आपल्या वापरकर्त्यांसाठी असंख्य उपकरणे घेऊन आला आहे. चला तर मग बघुया ॲपल च्या या स्मार्टवॉचची किंमत, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता.
Apple Watch Series 10 मधले स्मार्ट वॉच दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोडतात. ज्यामध्ये 42mm GPS प्रकाराची किंमत 46,900 रुपये इतकी असून यामधील टायटॅनियम पासून बनवलेल्या प्रकाराची किंमत 56,900 रुपये इतकी आहे. यामधील 46mm GPS सेल्युलर प्रकाराची किंमत 79,900 इतकी असून टायटॅनियम पासून बनवलेल्या प्रकाराची किंमत 84,900 रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी 10 सप्टेंबर पासून ऑनलाईन आणि Apple स्टोअर्स वर सुध्दा उपलब्ध असतील.
Apple Watch Series 10 मधील स्मार्टवॉच हे मोठ्या OLED डिस्प्ले सोबत आणि पातळ बेल्ट सोबत बनविण्यात आले आहेत. या सिरीज मधील स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने हे स्मार्टवॉच बनवताना स्टेनलेस स्टील ऐवजी टायटॅनियम चा वापर केला आहे. ज्यामुळे हे स्मार्ट वॉच Apple च्या यापूर्वीच्या घड्याळांच्या तुलनेत वजनाने हलके असणार आहे. नव्याने लॉन्च झालेल्या Apple Watch Series 10 मधील घड्याळे ही S10 या चीप द्वारे समर्थित आहेत.
Apple Watch Series 10 मधील स्मार्टवॉचमध्ये ऑन बोर्ड मायक्रोफोन सोबतच आवाज सुधारण्यासाठी नवीन न्यूरल प्रोसेसिंगला अनुमती देखील देता येते. स्मार्टवॉचमध्ये आता अंगभूत स्पीकर आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या मनगटावर थेट संगीत किंवा पॉडकास्ट प्ले करण्यास अनुमती देऊ शकते. या स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत, सर्वात महत्वाचे म्हणजे स्लीप एपनिया डिटेक्शन. Apple Watch Series 10 वापरकरत्यामध्ये स्लीप एपनियाची चिन्हे दिसली की नाही हे ओळखण्यास सक्षम आहे, ज्यामध्ये लोकांना झोपेत असताना अचानक श्वास घेणे थांबते. त्यामुळे ते लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात आणि योग्य उपचार घेऊ शकतात.
यामधील नवीन वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, Apple Watch Series 10 त्याच्या मागील मॉडेलप्रमाणेच औषधोपचार स्मरणपत्रे आणि AFib अलर्ट देण्यास सक्षम आहे. या स्मार्ट वॉच मध्ये डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे जो 50 मीटरच्या खोलीपर्यंत हे स्मार्टवॉच घालण्याची परवानगी देतो.
जाहिरात
जाहिरात