OnePlus Watch Lite एका चार्जवर 10 दिवसांपर्यंत वापरण्याची सुविधा देण्याचा दावा केला जातो.
Photo Credit: OnePlus
OnePlus Watch Lite सिल्व्हर, ब्लॅक स्टेनलेस फिनिश, काळे-पांढरे फ्लोरोरबर स्ट्रॅप्स उपलब्ध आहेत
OnePlus कडून OnePlus Watch Lite हे नवं स्मार्टवॉच युरोप आणि यूके मध्ये आणण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.46″ AMOLED 2.5D curved glass display, 8.9mm sleek design आणि polished stainless steel केस व क्राऊनचा समावेश आहे. कंपनीच्या प्रीमियम वॉच सिरीजच्या खाली असलेले, OnePlus Watch Lite हे Google च्या Wear OS ऐवजी OxygenOS वर चालते. या स्मार्टवॉचमध्ये 3000 निट्स ब्राइट एमोलेड डिस्प्ले, आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग आणि अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांसाठी सपोर्ट आहे. एका चार्जवर 10 दिवसांपर्यंत वापरण्याची सुविधा देण्याचा दावा केला जातो. OnePlus 15R सोबत निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये हे स्मार्टवॉच लाँच करण्यात आले.
OnePlus Watch Lite हे Silver आणि Black रंगातील स्टेनलेस-स्टील फिनिशमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे फ्लोरोरबर स्ट्रॅप्स दिले आहेत. हा स्मार्टवॉच सध्या काही युरोपियन देशांमध्ये आणि यूकेमध्ये लाँच झाला आहे. त्याची नियमित किंमत EUR 179 (सुमारे 19,000 रूपये ) आणि GBP 179 (सुमारे 21,600 रूपये ) आहे. सध्या, हे वॉच प्री-ऑर्डरसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असून, EUR 159 (सुमारे 16,800 रूपये) आणि GBP 159 (सुमारे 19,200 रूपये) मध्ये खरेदी करता येते.
OnePlus Watch Lite मध्ये 1.46 इंचाचा वर्तुळाकार AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे 464 × 464 pixel resolution आहे, 3000 निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस आहे आणि ते 2.5D curved glass आणि sapphire crystal ने संरक्षित आहे. हे स्मार्टवॉच BES2800BP चिपसेटवर चालते, जे 4GB eMMC अंतर्गत स्टोरेजसह जोडलेले आहे. OnePlus Watch Lite OxygenOS Watch 7.1 वर चालते आणि Wear OS घड्याळांप्रमाणे, ते थर्ड-पार्टी अॅप डाउनलोड किंवा मोबाइल पेमेंटला सपोर्ट करत नाही.
OnePlus Watch स्मार्टवॉच 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करते.यामध्ये cross-OS dual-phone pairing चा देखील समावेश आहे, ज्यामुळे घड्याळ एकाच वेळी दोन फोनशी कनेक्ट होऊ शकते, ज्यामध्ये अँड्रॉइड आणि आयओएस कॉम्बिनेशनचा समावेश आहे. हे फीचर भविष्यातील OTA update द्वारे सक्षम केले जाईल. हे घड्याळ दोन्ही डिव्हाइसेसवरील कॉलचे उत्तर देण्यास आणि सूचना देण्यास समर्थन देते. हे 350 हून अधिक वॉच फेस देखील देते.
जाहिरात
जाहिरात