सॅमसंग गॅलेक्सी बड्स ३ प्रो भारतात १९,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला
तुम्हांला नवे इअरबर्ड्स विकत घ्यायचे आहेत? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon's Prime Day 2025 sale मध्ये true wireless earbuds भरघोस सवलतीच्या दरामध्ये विकत घेण्याची आता तुम्हांला संधी आहे. सॅमसंगचे फ्लॅगशीप इअरबर्ड्स Galaxy Buds 3 Pro तुम्हांला विकत घेता येणार आहेत. 12 जुलै ते 14 जुलै दरम्यानच्या अमेझॉन प्राईम डे सेल मध्ये हे इअरबर्ड्स विकत घेता येतील. या तीन दिवसांच्या सेल चं आयोजन खास प्राईम मेंबर्स साठी करण्यात आले आहे. यात अनेक इलेट्रॉनिक वस्तू सवलती मध्ये विकत घेता येतील मग या इअरबर्ड खरेदीआधी जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स बद्दलही!
सॅमसंगचे हे Galaxy Buds 3 Pro जुलै 2024 मध्ये भारतात सादर करण्यात आले होते. तेव्हा त्याची किंमत 19,999 रुपये होती. त्याच वेळी, त्याचा बेस व्हेरिएंट, गॅलेक्सी बड्स 3 हे 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध होते. पण आता Buds 3 Pro अमेझॉनवर प्राइम डे 2025 सेलमध्ये फक्त 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच, तुम्ही अंदाजे या खरेदी मध्ये 9 हजार रुपयांची बचत करू शकता.
Galaxy Buds 3 Pro वर डिस्काउंट ऑफर आहेत. ग्राहकांना SBI आणि ICICI बँकेच्या कार्डवर 10 टक्के त्वरित सूट मिळणार आहे. HSBC, HDFC, फेडरल बँक आणि वनकार्ड क्रेडिट कार्ड वापरल्यास 1500 रुपयांची सूट मिळेल. त्याच वेळी, तुम्हाला कूपन डिस्काउंट, कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI सारखे पर्याय देखील मिळणार आहेत.
Galaxy Buds 3 Pro मध्ये 10.5 मिमी ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर्ससह उत्कृष्ट साऊंड क्वॅलिटी आहे. त्याच वेळी, त्यात 6.1 मिमी प्लॅनर ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे इयरबड्स एआय-बेस्ड अॅडॉप्टिव्ह अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन, म्हणजेच (एएनसी) सपोर्टसह येतात. तसेच, हे IP57 रेटेड असल्याने ते धूळ आणि पाण्या पासून सुरक्षित आहेत. ज्यामध्ये अँबियंट साउंड, व्हॉइस डिटेक्ट आणि सायरन डिटेक्ट सारख्या प्रगत फीचर्सचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ, ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि ऑटो स्विच सारखी फीचर्स आहेत.
Galaxy Buds 3 Pro इयरबर्ड्स सिल्व्हर आणि व्हाईट रंगात खरेदी करू शकता. यात 53mAh बॅटरी आणि केसमध्ये 515mAh बॅटरी आहे. ANC बंद असल्यास, चार्जिंग केससह इअरबड्स 30 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळवू शकतात.
जाहिरात
जाहिरात