ॅपल टीव्ही ही एकमेव प्रमुख स्ट्रीमिंग सेवा आहे ज्याकडे advertising-supported tier नाही. पण आता ती जाहिरातींसह दिसण्याची चर्चा सुरू आहे.
Photo Credit: Reuters
Apple TV+ सुरुवातीला फक्त कंपनी प्लॅटफॉर्म, आता Android डिव्हाइसवरही उपलब्ध आहे
Apple कडून त्यांच्या Apple TV+ स्ट्रीमिंग सेवेचे रीब्रँडिंग करण्यात आले आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्मला फक्त Apple TV म्हणून ओळखले जाणार आहे. एक प्रेस रीलीज जारी करत कंपनीने ही माहिती दिली आहे. अॅपल कंपनीने सोमवारी सकाळी F1 चित्रपटाच्या प्रीमियर तारखेची घोषणा करताना ही बातमी लपवून ठेवली, जो 12 डिसेंबर रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. दरम्यान Apple TV+ हा कंपनीचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जो सुरुवातीचा फक्त प्लॅटफॉर्म म्हणून होता परंतु आता तो Android डिव्हाइसवर देखील उपलब्ध आहे.
जेव्हा Apple ने Apple TV+ लाँच केले तेव्हा Apple TV हे नाव त्याच्या कनेक्टेड टीव्ही बॉक्सने आधीच घेतले होते, जे Roku किंवा Apple Fire TV डिव्हाइससारखेच कार्य करते आणि इतर स्ट्रीमिंग सेवा देते. अॅपलने ऑगस्ट महिन्यामध्ये स्ट्रीमिंग सेवेची किंमत 30 टक्क्यांहून अधिक वाढवली होती, जी $9.99 वरून $12.99 प्रति महिना झाली आहे. ही किंमत अमेरिकेसाठी आहे. भारतीय यूजर्सना प्रति महिना 99 रूपये मोजावे लागणार आहेत. जे यूजर्स नवीन आयफोन, आयपॅड, अॅपल टीव्ही सेट-टॉप बॉक्स किंवा मॅक कम्प्युटर वापरत आहेत त्यांना तीन महिन्यांसाठी त्यात मोफत अॅक्सेस मिळणार आहे. यामध्येअजून एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अॅपल टीव्ही ही एकमेव प्रमुख स्ट्रीमिंग सेवा आहे ज्याकडे advertising-supported tier नाही.
सध्या अमेरिकेसह 100 हून अधिक देशात, प्रदेशात प्रेक्षक Apple TV अॅपवर, iPhone, iPad, Apple TV 4K, Apple Vision Pro, Mac आणि इतर ब्रँडच्या स्मार्ट टीव्ही सारख्या अब्जाहून अधिक उपकरणांवर Apple TV पाहू शकतात. हे PlayStation 5 आणि Xbox Series X/S सारख्या गेमिंग कन्सोलवर देखील उपलब्ध आहे.
Apple TV हे नवीन नाव मोठ्या बदलांची पूर्वसूचना असू शकते. अलिकडच्या काही महिन्यांत जाहिरात जगात अशी अटकळ लावली जात आहे की Apple नेटफ्लिक्स आणि इतरांचे अनुसरण करून नफा वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना पर्याय देण्यासाठी ad-supported plan मध्ये येऊ शकतात.
ऑक्टोबर 2025 मध्ये अॅपलकडून इतरही मोठ्या योजना जाहीर होणार आहेत, वर्षातील शेवटचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत होण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरच्या लाँचबद्दल काही चर्चा समोर आल्या आहेत. जाहीर होणाऱ्या बहुतेक मोठ्या उत्पादनांमध्ये M5 चिपसेट केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.
जाहिरात
जाहिरात