Photo Credit: App Store
Instagram कडून एक नवं स्टॅन्डअलोन अॅप जाहीर करण्यात आले आहे ज्यामध्ये सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर अधिक उत्तम आणि क्रिएटीव्हली व्हिडिओ एडिट करता येणार आहेत. ‘Edits'असं हे अॅप असून आजच त्याची घोषणा करण्यात आली आहे. मोबाईल व्हिडिओ एडिटिंग वर पर्याय म्हणून हा अॅप लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये अनेक क्रिएटिव्ह टूल्सचा समावेश आहे ज्यामध्ये उच्च प्रतीचा व्हिडिओ कॅप्चर, ड्राफ्ट्स आणि व्हिडिओ साठी स्वतंत्र टॅब आहे. चांगल्या रेझेल्युशन साठी सेटिंग आहे. डायनॅमिक रेंज साठी फ्रेम रेट आहे. एडिटस च्या युजर्सना artificial intelligence (AI) capability चा देखील फायदा घेता येणार आहे. यामुळे अॅनिमेशनचा वापर करता येणार आहे.
Threads,वर Instagram head Adam Mosseri याने केलेल्या पोस्ट द्वारा Edits app ची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्टफोन वर व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्सुक असणार्यांसाठी हे खास अॅप लॉन्च होत आहे असे त्याने म्हटलं आहे. त्यांच्या दाव्यानुआर, या अॅपमुळे युजर्सची व्हिडिओ एडिट करण्याचं काम सुकर होणार आहे. कारण यामध्ये high-quality footage कॅप्चर करता येणार आहे. सोबत झटपट एडिटींग करता येणार आहे. Edits,च्या मदतीने युजर्स वॉटरमार्क शिवाय व्हिडिओ देखील शेअर करू शकतात.
Instagram च्या माहितीनुसार, Edits app सध्या iOS साठी App Store वर प्री ऑर्डर साठी उपलब्ध आहे. तर लवकरच ते Android वरही उप्लब्ध होईल. पुढील महिन्यापासून ते डाऊनलोड देखील करता येऊ शकतं.
एडिट्स मध्ये क्रिएटर्स typefaces, साऊंड, वॉईस इफेक्ट्स, फिल्टर्स मधून अनेक पर्याय निवडू शकतात. ऑडिओ मध्येही background noise काढता येऊ शकतो. त्यामुळे अधिक क्लिअर ऑडिओ मिळू शकतो. आवाजासोबत automatically generated captions देखील मिळतील. ते customisable असेल. व्हिडिओ एडिटिंग पेक्षा बरंच काही Edits मध्ये मिळणार आहे. अॅप वरील शेअर केलेल्या व्हिडिओजचे live insights dashboard वर मॉनिटरिंग करता येणार आहे. यामध्ये व्हिडिओ वरील एंगेजमेंट ही फॉलोव्हर्स आणि नॉन फॉलोव्हर्स साठी किती आहे याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे audience prefers नुसार व्हिडिओ प्लॅन करण्यासही मदत होणार आहे.
जाहिरात
जाहिरात