भारत, अमेरिका आणि निवडक देशांमध्ये इंस्टाग्राम कडून हे दिवाळी-थीम इफेक्ट्स मिळणार आहेत.
Photo Credit: Instagram
Restyl मध्ये फोटो, स्टोरी किंवा व्हिडिओंसाठी अनेक दिवाळी इफेक्ट्स उपलब्ध आहेत
Instagram stories आणि edits ना यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खास मेकओवर मिळणार आहे. इंस्टाग्रामने आता नवे फेस्टिव्ह अपडेट्स आणले आहेत ज्यात Restyle feature चा समावेश आहे. Restyl मध्ये अनेक दिवाळी इफेक्ट्स आहेत. तुम्ही इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत असाल स्टोरीज शेअर करत असाल किंवा व्हिडिओ एडिट करत असाल तरीही हा पर्याय मिळणार आहे. दिवाळीच्या 3 खास इफेक्ट्स मधून एकाची निवड करून तुमचा कंटेड फेस्टिव्ह बनवू शकता. दिवाळी मधील रंग, रीती परंपरा आणि धम्माल लक्षात घेऊन हे इफेक्ट्स बनवण्यात आले आहेत.फोटोंसाठी, इंस्टाग्राम फटाके, दिवे आणि रांगोळी थीम ऑफर करते. व्हिडिओंसाठी, कंदील, झेंडू आणि रांगोळी इफेक्ट्स आहेत.
इंस्टाग्राम कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे इफेक्ट्स मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. 17 ऑक्टोबर पासून दिवाळीची धामधूम सुरू होत आहे. दरम्यान हे फीचर 29 ऑक्टोबरपर्यंत यूजर्सच्या सेवेमध्ये असणार आहे. दरम्यान दिवाळी धूम भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहात तेथे स्थायिक भारतीय करत असल्याने आता हे फीचर भारतासह अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये उपलब्ध असणार आहे
जाहिरात
जाहिरात