आता होणार Instagram reels अजूनच वायरल, Instagram च्या नवीन वैशिष्ट्यांसह.

आता होणार Instagram reels अजूनच वायरल, Instagram च्या नवीन वैशिष्ट्यांसह.

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • Instagram ने लॉन्च केले आहे, 20 ऑडियो ट्रॅक्स जोडणारे नवीन वैशिष्ट्य.
  • Instagram reels ला मिळणार अधिक प्राधान्य.
  • तुम्ही तयार केलेले ट्रॅक्स इतर वापरकर्त्यांना सुद्धा Instagram reels मध
जाहिरात
Instagram चे प्रमुख अध्यक्ष ऍडम मोसेरी ह्यांनी ह्यापुढे Instagram मोठ्या किंवा लांब विडियो पेक्षा छोट्या आणि कमी वेळ चालणाऱ्या विडियोला म्हणजेच Instagram Reels ला जास्त प्राधान्य देण्याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या ह्या वक्तव्याला काही दिवसच उलटून गेले आणि त्यांनी इंस्टाग्रामच्या नवीन वैशिष्ट्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये वापरकर्ते एकाच Instagram reel मध्ये एकापेक्षा अधिक ऑडियो ट्रॅक जोडू शकतात, ज्यांची जास्तीत जास्त संख्या 20 पर्यंत ठेवण्यात आली आहे. 

Instagram reels वर मल्टी ऑडियो ट्रॅक कसे वापरावे?


•    Instagram वर नवीन वैशिष्ट्य उपलब्ध असल्या कारणाने तुम्हाला सर्वांत आधी तुमचं Instagram Update करावं लागेल.

•    त्यानंतर Instagram च्या विडियो एडिटरमधून ॲप्लिकेशन उघडा आणि Add To Mix हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. 

•    आता तुम्हाला जे ट्रॅक्स जोडायचे आहेत, ते निवडा.

•    तुम्ही तुमची Instagram reel तयार करून अपलोड केल्यानंतर बाकीचे वापरकर्ते देखील त्यांच्या विडियोसाठी हे ट्रॅक्स वापरू शकतात.

Instagram Features आणण्याचे उद्देश्य.


Instagram चे प्रमुख अध्यक्ष मोसेरी ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी Instagram चा सर्व प्रकारे अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, Instagram वर जरी कमी वेळेचा आणि लांब अशा दोन्ही प्रकारच्या विडियो उपलब्ध असल्या तरी सुद्धा वापरकर्त्यांची आवड ही छोट्या विडियो म्हणजे Instagram reels कडे जास्त आहे. 

सर्वसाधारणपणे दोन वापरकर्ते ज्यांना समान गोष्टींमध्ये रुची आहे ते अशा प्रकारच्या विडियोज एकमेकांसोबत जास्त प्रमाणात शेयर करत असतात. त्यामुळे Instgram वर सध्यातरी Instagram reels ची मागणी जास्त आहे. आणि म्हणूनच हे अगदी साहजिक आहे की, Instagram भविष्यात Instagram reels ला अधिक प्राधान्य देणार आहे. 

फेसबुक आणि YouTube वरील विडियो कंटेंट ची मागणी लक्षात घेता, 2018 मध्ये IGTV नावाचं एक स्वतंत्र व्यासपीठ सुरू करण्यात आले होते. भविष्यात ह्या विडियो द्वारे वापरकर्त्यांना पैसे कमविण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार होती, पण 2020 मध्ये Tik Tok भारतात बंद झाल्याने Instagram ने त्याचा फायदा घेत Instagram reels ची सुरुवात केली. आणि त्यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला. ह्यामुळे भविष्यात Instagram कडून अधिकाधिक असे उपक्रम राबविण्यात येतील.

मित्रांनो तुम्हाला ही Instagram reels पाहायला किंवा बनवायला आवडतात का? ह्या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला काय बदल जाणवत आहे हे आम्हाला नक्की कळवा.
 
Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. CMF Phone 2 Pro लॉन्च साठी सज्ज; पहा फोनमध्ये कोणती आहे चीपसेट
  2. Vivo X200 Ultra मध्ये कसा असेल कॅमेरा? लॉन्च पूर्वीच जाणून घ्या हे नवे अपडेट्स
  3. PhonePe ने लॉन्च केलं UPI Circle फीचर; बॅंक अकाऊंट नसतानाही व्यवहाराची अशी मिळेल मुभा
  4. 8,000mAh battery, 12GB RAM आणि कमाल 512GB storage सह लॉन्च झाला
  5. Realme 14T भारतात लवकरच होणार लॉन्च; पहा काय असू शकते प्राईज रेंज
  6. अक्षय्य तृतीयेला सॅमसंगचा जबरदस्त फोन विकत घ्या; पहा काय आहेत हॉट ऑफर्स
  7. OPPO K13 5G भारतात येत आहे 7000mAh बॅटरीसह, लाँच होण्यापूर्वी या साइटवर टीझर
  8. Realme Narzo 80 Pro 5G, Realme Narzo 80x 5G आला बाजारात पहा स्पेसिफिकेशन्स, किंमत, ऑफर्स
  9. Huawei Watch Fit 3 आलं बाजरात; पहा किंमत काय? डिस्काऊंट ऑफर्स काय?
  10. Motorola Edge 60 Stylus भारतात येण्यासाठी सज्ज; पहा फोनमध्ये काय खास?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »