JioSaavn हे अँड्रॉइड आणि iOS दोन्ही उपकरणांसाठी अॅप म्हणून उपलब्ध आहे, तसेच डेस्कटॉपसाठी वेबवर देखील उपलब्ध आहे.
Photo Credit: JioSaavn
वापरकर्ते वार्षिक सबस्क्रिप्शनसह जाहिरात-मुक्त संगीत स्ट्रीमिंगचा लाभ घेऊ शकतात.
JioSaavn कडून बुधवारी JioSaavn Pro subscription साठी मर्यादित काळासाठी एक नवा वार्षिक प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये रसिकांना अॅड फ्री म्युझिक स्ट्रिमिंग, हाय क्वॅलिटी प्लेबॅक, ऑफलाईन डाऊनलोड्स यासारखे पर्याय मिळणार आहे. नव्या वार्षिक प्लॅन मध्ये आता वर्षभराचे पैसे देण्याऐवजी केवळ मासिक शुल्क द्यावे लागणार आहे. नवा JioSaavn Annual Pro plan हा केवळ त्याच यूजर्सना मिळणार आहे ज्यांच्याकडे 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ याची सदस्यता नाही. कंपनीच्या माहितीनुसार, 399 रुपयांचा हा प्लॅन JioSaavn च्या 10 कोटींहून अधिक गाण्यांच्या आणि पॉडकास्टच्या संपूर्ण लायब्ररीमध्ये प्रवेश करता येणार आहे. ज्यामध्ये विविध भाषा आणि शैलींचा समावेश आहे. या सेवेमध्ये बॉलिवूड, प्रादेशिक, स्वतंत्र, भक्ती आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा समावेश आहे, तसेच पॉडकास्टही आहेत.
JioSaavn Annual Pro Plan हा वर्षभरासाठी 399 रूपयांचा आहे.ही लिमिटेड टाईम ऑफर आहे. पण अद्याप त्याची 'end date' सांगण्यात आलेली नाही. नवं सब्सस्क्रिप्शन हे Android, iOS, JioPhone आणि वेब सारख्या डिव्हाइसेस आणि प्लॅटफॉर्मवर वैध आहे. सामान्यपणे JioSaavn Pro plans हे भारतामध्ये वैयक्तिक यूजर्स साठी प्रति महिना 89 रूपयांपासून सुरू झाला अहे. हाच Student plan प्रति महिना 49 रूपये होता. Duo and Family plan हा 129 आणि 149 रूपयांपासून सुरू होतो. जो दोन महिन्यांसाठी वैध होता.
पहिल्या पर्यायात दोन यूजर्सना त्यांचे खाते एकाच सबस्क्रिप्शनमध्ये एकत्रित करण्याची परवानगी दिली जाते, तर दुसऱ्या पर्यायात मुख्य यूजरला कुटुंबातील पाच सदस्यांना आमंत्रित करण्याची परवानगी दिली जाते, प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिकृत प्रो अकाऊंट असते.
JioSaavn Annual Pro Plan मध्ये इतर प्लॅन्सप्रमाणेच फायदे आहेत. हे यूजर्सना जाहिरातींशिवाय फक्त म्युझिक स्ट्रीमिंगचा आनंद घेण्यास अनुमती देते. ते JioSaavn अॅपवरून गाणी डाउनलोड करू शकतात आणि इंटरनेटची आवश्यकता नसतानाही ऑफलाइन ऐकू शकतात. JioSaavn सबस्क्रिप्शन 320kbps वर हाय क्वॅलिटी मध्ये म्युझिक स्ट्रीमिंगची परवानगी देते.
रिलायन्स जिओ यूजर्सना एक अतिरिक्त फायदा मिळतो. ते त्यांच्या जिओ नंबरसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित जिओट्यून्स सेट करू शकतात.
JioSaavn हे Android आणि iOS दोन्ही उपकरणांसाठी अॅप म्हणून उपलब्ध आहे. ते आयपॅड आणि डेस्कटॉपवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही वेबवर देखील म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश करून आनंद घेऊ शकता.
जाहिरात
जाहिरात
Assassin's Creed Shadows Launches on Nintendo Switch 2 on December 2