Photo Credit: WhatsApp
WhatsApp कडून आता Texting आणि Calling चा अनुभव सुधारण्यासाठी नवं फीचर आता नव्या वर्षामध्ये येणार आहे. याची घोषणा कंपनीकडून गुरूवारी करण्यात आली आहे. मर्यादित काळासाठी व्हॉट्सअॅप युजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान New Year theme चा इफेक्ट अनुभवता येणार आहे. या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म वर नवं अॅनिमेशन आणि स्टिकर्स पॅक्स पाहता येणार आहेत. Meta Platforms च्या Instagram या अॅपवर मर्यादित वेळेसाठी dubbed 2024 Collage फीचर देण्यात आले आहे.
WhatsApp,च्या माहितीनुसार, आता युजर्स व्हिडिओ कॉल्स करून या फेस्टिव्ह सीझन मध्ये बॅकग्राऊंडला इफेक्ट्स, फिल्टर्स ठेवू शकणार आहेत. यामध्ये नवी अॅनिमेटेड रिअॅक्शन असणार आहेत. मेसेजला रिअॅक्ट करताना party emojis चा वापर करता येणार आहे. मेसेज पाठवणार्या आणि मेसेज ज्यांना मिळणार आहे त्यांना confetti animation मिळणार आहे.
व्हॉट्सअॅपने नवी स्टिकर्स आणली आहेत. त्यामध्ये New Year's Eve (NYE) sticker pack चा समावेश आहे. त्यासोबतच New Year theme असणार आहेत. व्हॉट्सअॅप ने दिलेल्या माहितीनुसार, holiday wishes देता येणार आहेत. ही मजेशीर आणि इंटरअॅक्टिव्ह पद्धतीने देता येणार आहेत.
येत्या आठवड्यामध्ये WhatsApp वर ही नवीन फीचर्स जोडली जातील. दरम्यान मागील आठवड्यात व्हिडिओ कॉल वर काही इफेक्ट्स जारी करण्यात आली आहेत त्यामध्ये puppy ears, underwater,आणि karaoke microphone चा समावेश आहे. युजर्स आता 10 इफेक्ट्स निवडू शकणार आहेत. ग्रुप मध्येही आता इतरांना त्रास न देता काही निवडक लोकं देखील ग्रुप कॉल वर बोलू शकतात.
WhatsApp ने यापूर्वी चॅट्स मध्ये रिअल टाईम एंगेजमेंट मध्ये typing indicators देत आहे. यूजर्सना चॅट्समध्ये प्रोफाईल पिक्चर द्वारा दिसू शकेल की कोण टायपिंग करत आहे. हे वन टू वन सोबतच group conversations मध्येही हा पर्याय दिसणार आहे.
व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट हे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. नावानुसारच व्हॉट्सअॅपने आता जो व्हॉईस मेसेज येणार आहे त्याचं ट्रान्सक्रिप्शन मिळणार आहे. केवळ मेसेज मिळवणार्याला voice message चं ट्रान्सक्रिप्ट पाहता येणार आहे. हे ट्रान्सक्रिप्ट डिव्हाईस वर जनरेट होणार आहे त्यामुळे पाठवणारा देखील ते वाचू शकणार आहे.
जाहिरात
जाहिरात