नॉइज मॅनेजमेंटसाठी, मास्टर बड्स मॅक्स तीन मोड ऑफर करतो ज्यामध्ये एएनसी (अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन), अॅडॉप्टिव्ह एएनसी आणि ट्रान्सपरन्सी मोड आहे.
Photo Credit: Noise
नॉइज मास्टर बड्स मॅक्सचे वजन सुमारे २६२ ग्रॅम आहे.
Noise कडून over-ear headphones हा Master Buds Max भारतामध्ये लॉन्च केला आहे. हा हेडफोन Bose सोबत करण्यात आला आहे. हा हेडफोन यंदा लॉन्च झालेल्या Master Buds TWS प्रमाणे आहे. हे हेडफोन्स बॅलन्स्ड, 'high-quality expertly-tuned audio', 'सेगमेंट-लीडिंग ANC' आणि '60 तासांपर्यंत प्लेटाइम' देण्याचा दावा करतात. पहिल्या ऑफरचा भाग म्हणून त्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि जर तुम्ही या बजेटमध्ये वर उल्लेख केलेल्या हायलाइट्ससह वायरलेस हेडफोन शोधत असाल तर पहा अपडेट्स.
नवे Noise headphones हे 9999 रूपयांना मिळणार आहे पण ही किंमत फक्त काही दिवसांसाठी असणार आहे. त्यानंतर या हेडफोन्ससाठी सुमारे Rs 11,999 मोजावे लागतील. gonoise.com वर ते खरेदी करता येणार आहे. सोबतच Reliance Digital, Croma and Vijay Sales सारख्या ऑफलाईन स्टोअरमध्येही उपलब्ध आहे. हे हेडफोन तीन रंगांमध्ये मिळणार आहेत. Titanium (beige), Silver, Onyx (black) असे हे तीन रंग आहेत.
The Noise Master Buds Max मध्ये Bose चे साउंड ट्यूनिंग वापरण्यात आले आहे. LHDC सारख्या हाय-रेझॉल्यूशन कोडेक्सद्वारे सपोर्टेड 40 मिमी ड्रायव्हर आहे. The companion app मध्ये डायनॅमिक इक्वेलायझर फीचर आहे जे ऐकण्याच्या परिस्थितीत स्पष्टता राखण्यासाठी आवाज पातळीनुसार ध्वनी फ्रिक्वेन्सी स्वयंचलितपणे अॅडजस्ट करण्याचा दावा करते. कमी आवाजात, EQ बास आणि ट्रेबलला चालना देतो असे म्हटले जाते, तर जास्त आवाजात, ते distortion टाळण्यासाठी मदत करते.
कंपनीच्या माहितीनुसार या हेडफोन्सची बॅटरी लाइफ ६० तास सतत प्लेबॅकवर रेट केली जाते, १० मिनिटांच्या जलद चार्जिंगसह १० तासांपर्यंत वापरू शकतात. हे हेडफोन्सचे वजन २६२ ग्रॅम आहे आणि टिकाऊपणा आणि आरामासाठी व्हेगन लेदर कुशन आणि एरोस्पेस-ग्रेड मेटॅलिक ग्रिल आहेत.
इतर टेक्निकल फीचर्स मध्ये कस्टम साउंड सेटिंग्जसाठी नॉइज अॅपसह सुसंगतता समाविष्ट आहे. कंपनीच्या मते, हेडफोन्स ड्युअल-डिव्हाइस पेअरिंग सपोर्टसह स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या कनेक्टेड डिव्हाइसेसमध्ये स्विच करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. नॉइज मॅनेजमेंटसाठी, मास्टर बड्स मॅक्स तीन मोड ऑफर करतो ज्यामध्ये एएनसी (अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन), अॅडॉप्टिव्ह एएनसी आणि ट्रान्सपरन्सी मोड, यामध्ये एएनसी ४० डीबी पर्यंत प्रभावी आहे. नॉइजच्या मते, अॅडॉप्टिव्ह एएनसी कामगिरीची ६१ फ्रिक्वेन्सी पॉइंट्सवर चाचणी करण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात