Photo Credit: Ministry of Railways
भारताच्या रेल्वे मंत्रालयाकडून शुक्रवारी SwaRail हे नवं अॅप समोर आणलं आहे. या अॅपवर युजर्सना सार्या सोयी मिळणार आहे. त्यामध्ये तिकीट रिझर्व्हिंग, फूड ऑर्डर करणं, पीएनआर स्टेटस पाहणं हे करता येणार आहे. सध्या हे अॅप अॅन्ड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्म वर पाहता येणार आहे. SwaRail superapp मुळे आता प्रवाशांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी अॅप्स डाऊनलोड करावी लागणार नाहीत. हे ॲप बीटा चाचणीसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच सर्वांसाठी लाँच केले जाईल.
SwaRail Superapp हे अॅप Centre for Railway Information Systems अर्थात CRIS कडून डेव्हलप करण्यात आले आहे. हे भारतात रेल्वेप्रवास करणार्यांना one-stop solution ठरणार आहे. SwaRail superapp,च्या माध्यमातून रेल्वे प्रवासादरम्यान लागणार्या सोयी ऑनलाईन मिळणार आहेत. त्यामध्ये रिझर्व्ह, अन रिझर्व्ह आणि प्लॅटफॉर्म तिकीट देखील बूक करता येणार आहे. पार्सल डिलेव्हरीची माहिती मिळणार आहे. पीएनआर स्टेटस पाहता येईल. ट्रेन मध्ये जेवण ऑर्डर करता येणार आहे. तर मदतीसाठी 'रेल मदत' चा फायदा घेता येणार आहे.
सध्या, भारतीय रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आणि ट्रेनच्या मूव्हमेंट आणि वेळापत्रकांचे अपडेट्स पाहण्यासाठी विविध ॲप्स आहेत. तथापि, SwaRail superapp हे एक प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले जाते ज्याचा वापर वाढीव सोयीसाठी स्मार्टफोनवरून थेट वर नमूद केलेली कामे करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचे integration अधिक माहिती प्रदर्शित करण्यास अनुमती देईल.
सध्या प्रवाशांना तिकीटाच्या बुकिंगसाठी वेगळं अॅप आणि शेड्युल, लाईव्ह ट्रॅकिंग साठी वेगळं अॅप वापरावं लागणार आहे. यात सिंगल साइन-ऑन फीचर असणार आहे.
सुरक्षेचा विचार करता, यात MPIN आणि बायोमेट्रिकसह अनेक लॉगिन पर्याय दिले जाणार आहेत. नोंदणी नसल्यास, मोबाइल क्रमांक आणि ओटीपीद्वारे काही सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. बीटा व्हर्जन टेस्ट करणारे प्रवासी swarrail.supportcris.org.in या ईमेलद्वारे थेट CRIS ला त्यांचा अभिप्राय देऊ शकतात. फुल-स्केल रोलआउट करण्यापूर्वी युजर्सकडील इनपुट ॲप मध्ये सुधारणा करण्यात मदत करेल.
जाहिरात
जाहिरात