Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी

Vivo TWS 5 Series इअरबड्समध्ये स्मार्ट ट्रान्सलेट फीचर देखील समाविष्ट आहे जे इंग्रजी, चिनी, जपानी, कोरियन, फ्रेंच आणि थाई यासह अनेक भाषांमध्ये थेट भाषांतर करू शकते.

Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी

Photo Credit: Vivo

Vivo TWS 5 सिरीजच्या इयरफोन्सना हाय-रेझ ऑडिओ प्रमाणपत्र आहे

महत्वाचे मुद्दे
  • दोन्ही मॉडेल्स Hi-Res Audio certified आहेत
  • ईयरबर्ड्सची बॅटरी लाइफ प्रति चार्ज 12 तासांपर्यंत (ANC बंद) आणि केससह
  • Vivo TWS 5 Hi-Fi model हे Deep Sea Blue आणि White रंगामध्ये उपलब्ध आहे
जाहिरात

Vivo TWS 5 series चीन मध्ये सोमवारी लॉन्च झाले आहेत. हे नवे truly wireless stereo (TWS) हेडफोन्स Vivo X300 आणि X300 Pro सोबत लॉन्च करण्यात आले आहेत. या सीरीज मध्ये standard Vivo TWS 5 आणि the Vivo TWS 5 Hi-Fi चा समावेश आहे. जो मागील वर्षीच्या Vivo TWS 4 model प्रमाणे आहे. दोन्ही मॉडेल्स हे 11mm dynamic drivers सह आहेत आणि active noise cancellation (ANC) ला सपोर्ट करतात. ज्यामुळे सभोवतालचा आवाज 60 डेसिबलपर्यंत कमी होतो असा दावा केला जातो. हे इयरफोन चार्जिंग केससह एकूण 48 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात असे म्हटले जाते.

Vivo TWS 5 series ची किंमत काय?

Vivo TWS 5 ची किंमत CNY 399 म्हणजे भारतीय रूपयामध्ये 5000 आहे तर Vivo TWS 5 Hi-Fi ची किंमत CNY 499 आहे ज्याची भारतीय रूपयांमध्ये किंमत अंदाजे 6000 रूपये होते. स्टॅन्डर्ड व्हर्जन हे पांढर्‍या, काळ्या आणि स्मोकी पर्पल रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर Hi-Fi model हे Deep Sea Blue आणि White रंगामध्ये उपलब्ध आहे.

Vivo TWS 5 series ची सपेसिफिकेशन्स

Vivo TWS 5 series मध्ये 11mm dynamic drivers आणि advanced second-generation ceramic tungsten acoustic diaphragm आहे. ज्याला नॅनो कोटिंग आहे. ज्यामुळे त्यांचा टिकाऊपणा वाढण्यास मदत होते. Hi-Fi variant ला LDAC, LHDC, AAC, SBC, आणि LC3 codecs, चा सपोर्ट आहे. standard model मध्ये LHDC नाही. दोन्ही मॉडेल्स Hi-Res Audio certified आहेत. DeepX 4.0 stereo sound tuning आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, ते १० मीटर पर्यंतच्या रेंजसह ब्लूटूथ ५.४ वापरतात आणि फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप दरम्यान स्विचिंगसाठी ट्रिपल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात. गेमिंग यूजर्सना ४२ मिलीसेकंद कमी-लेटन्सी मोड मिळतो. स्पष्ट आवाज पिकअपसाठी तुम्हाला तीन मायक्रोफोनसह एआय-आधारित कॉल नॉइज रिडक्शन देखील मिळते. या इअरबड्समध्ये स्मार्ट ट्रान्सलेट फीचर देखील समाविष्ट आहे जे इंग्रजी, चिनी, जपानी, कोरियन, फ्रेंच आणि थाई यासह अनेक भाषांमध्ये थेट भाषांतर करू शकते.

ईयरबर्ड्सची बॅटरी लाइफ प्रति चार्ज 12 तासांपर्यंत (ANC बंद) आणि केससह 48 तासांपर्यंत रेट केली जाते. ANC सक्षम असल्यास, यूजर्स प्रति चार्ज 6 तास आणि एकूण 24 तासांपर्यंत अपेक्षा करू शकतात.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी
  2. Bose-ट्यून केलेले Noise Master Buds Max भारतात लॉन्च; मिळणार 60 तासांचा प्लेबॅक
  3. AI ची मज्जा अनुभवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये! Nano Banana आता लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये
  4. आता वेबपेज वाचायची गरज नाही; Gemini थेट देणार सारांश
  5. Redmi K90 Pro झाला Geekbench वर स्पॉट? Snapdragon 8 Elite Gen 5 Chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज; पहा अपडेट्स
  6. Nothing Phone 3a चं आता येणार लाईट व्हर्जन; समोर आले स्पेसिफिकेशन्सचे लीक्स
  7. iQOO 15 मध्ये मिळणार प्रीमियम 8K VC Ice Dome कूलिंग सिस्टिम;गेमिंग अनुभव होणार अधिक मस्त
  8. Apple चा पहिला फोल्डेबल iPhone येणार परवडणार्‍या दरात? Ming-Chi Kuo यांचा खुलासा
  9. Realme GT 8 Pro नोव्हेंबर महिन्यात भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत; पहा कॅमेर्‍यामध्ये मिळणारी दमदार फीचर्स काय
  10. Apple TV+ च्या नावात बदल; Brad Pitt,Kerry Condon चा F1 The Movie स्ट्रीमिंगसाठी तयार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »