झ फीचरला व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट Android बीटा अपडेट मध्ये स्पॉट करण्यात आलं आहे.
Photo Credit: Pexels/Anton
WABetaInfo ने Android 2.25.30.5 बीटा नंतर व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर शोधले
WhatsApp हे जगभर आबालवृद्धांसाठी लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप आपले यूजर्स वाढवण्यासाठी आणि सध्याच्या यूजर्सना टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी अपडेट्स आणत असते. आता WhatsApp सध्या एक असं फीचर डेव्हलप करत आहे ज्याच्यामुळे चॅनल अॅडमिन दुसर्या मेंबर्स आणि यूजर्स सोबत एका नव्या प्रकारे इंटरॅक्ट करू शकणार आहेत. एका फीचर ट्रॅकरच्या द्वारा शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, हे Quiz Feature आहे आणि या फीचरमुळे 'फ्रेंडली कॉम्पिटिशन'ला प्रोत्साहन मिळू शकतं. Quiz Feature द्वारा अॅपवर एंगेजमेंट सुधारण्यासाठी मदत होणार आहे. व्हॉट्सअॅप कडून मात्र अद्याप या फीचरची माहिती देण्यात आलेली नाही. या फीचरला व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट Android बीटा अपडेट मध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. जेथे याला बीटा टेस्टर्स कडून तपासण्यात आलं आहे त्याला अॅनलाईज करण्यात आलं आहे.
फीचर ट्रॅकर WABetaInfo ने अॅन्ड्रॉईड 2.25.30.5 साठी व्हॉट्सअॅप बीटा अपडेट नंतर डेव्हलप्ड एक नवीन फीचर स्पॉट केलं आहे. हे फीचर अॅडमीनला व्हॉट्सअॅप चॅनल मध्ये क्वीझ क्रिएट करण्याची सुविधा देते. हे फीचर पोल पेक्षा वेगळं असेल असं सांगण्यात आलं आहे. यामध्ये अधिकची फॅसिलिटी आहे. त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट विषयावर मेंबर्सचं ज्ञान तपासण्याची क्षमता असणार आहे.
समजा, युजर ऑटोमोबिल अपडेट्स किंवा न्यूज शेअर करण्यासाठी चॅनल बनवत असेल तर तो आपल्या मेंबर्सना प्रश्न विचारू शकतो. व्हॉट्सअॅप फीचर्स ट्रॅकरने दोन स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत ज्यात हे नवीन फीचर चॅट विंडोच्या अटॅचमेंट मेनूमध्ये दिसेल हे दर्शविले आहे. जेव्हा यूजर्स त्यावर क्लिक करेल तेव्हा 'क्विझ तयार करा' मेनू उघडेल, जिथे पहिला बॉक्स प्रश्नासाठी असेल आणि उर्वरित बॉक्स उत्तर पर्यायांसाठी असतील.
रिपोर्ट्समध्ये किती पर्याय जोडले जाऊ शकतात हे सांगितलेले नाही, परंतु स्क्रीनशॉटनुसार, व्हॉट्सअॅप चॅनेल अॅडमिन किमान पाच पर्याय जोडू शकतील. इन्स्टंट मेसेजिंग सेवा यूजर्सना मजकूर आणि फोटो दोन्ही पर्याय देण्याची परवानगी देखील देऊ शकते. एकदा क्विझ तयार झाल्यानंतर, ती चॅनेलला संदेश म्हणून पाठवली जाईल. इतर चॅनेल सदस्य त्यांच्या निवडलेल्या पर्यायाच्या डावीकडील चेक मार्कवर क्लिक करून उत्तरे निवडू शकतील. अहवालानुसार, चॅनेल व्हिझिटर्स देखील क्विझमध्ये सहभाग घेऊ शकतील.
जेव्हा यूजर्स एखाद्या पर्यायावर क्लिक करतो तेव्हा योग्य उत्तर दाखवणारा एक क्विझ कार्ड दिसेल. बीटा टेस्टर्सद्वारे पूर्णपणे चाचणी झाल्यानंतर, भविष्यातील अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप हे चॅनल क्विझ फीचर आणण्याच्या विचारात आहे.
जाहिरात
जाहिरात