WhatsApp चे नवीन वैशिष्टय होणार लॉन्च, पाहा काय आहेत अटी.

Block Unknown Account Messages नावाचे एक वैशिष्टय म्हणजेच कोणत्याही अज्ञात किंवा अनोळखी नंबरवरून तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर, त्यास तुम्ही ब्लॉक करू शकता, तेही एका सेटिंग द्वारे.

WhatsApp चे नवीन वैशिष्टय होणार लॉन्च, पाहा काय आहेत अटी.

Photo Credit: Unsplash

महत्वाचे मुद्दे
  • WhatsApp वापरकर्त्यांना स्पॅम सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे.
  • हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनची कार्यक्षमता ऑप्टिमाइझ करू शकते
  • WhatsApp बीटा टेस्टर्स आता स्टेटस अपडेटवर लाईक्ससह प्रतिक्रिया देऊ शकतात
जाहिरात
मित्रांनो आपण आपल्या फोन नंबरची किंवा आपल्या खाजगी गोष्टींच्या सुरक्षिततेची काळजी नेहमीच घेत असतो. त्याप्रमाणेच WhatsApp सुध्दा आपल्या वापरकर्त्यांना फक्त चांगला अनुभव नाही, तर त्यांच्या सर्व माहितीची आणि वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता पाळली जात आहे, की नाही याची काळजी नेहमीच घेत असतो. त्यासाठी WhatsApp सतत नवनवीन वैशिष्ट्य अपडेट करत असतो. त्यासाठीच WhatsApp त्यांचे असेच एक नवीन वैशिष्टय लॉन्च करणार आहे. चला तर मग बघुया, काय आहे WhatsApp चे नवीन वैशिष्टय. 

WhatsApp चे नवीन वैशिष्टय.


कोणत्याही अनोळखी मोबाईल नंबर किंवा संपर्काकडून आलेले संदेश हे वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेता WhatsApp ने एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी घेतली आहे. Block Unknown Account Messages नावाचे एक वैशिष्टय म्हणजेच कोणत्याही अज्ञात किंवा अनोळखी नंबरवरून तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यास तुम्ही ब्लॉक करू शकता, तेही एका सेटिंग द्वारे. WhatsApp अपडेट ट्रॅकर, WABetaInfo ने हे वैशिष्ट्य शोधून काढले आणि नोंदवले आहे. ज्यामुळे अज्ञात किंवा अनोळखी संपर्का वरील सर्व संदेश अवरोधित केले जाणार नाही आहेत. यामध्ये फक्त विशिष्ट थ्रेशोल्ड ओलांडलेल्या संदेशांचा समावेश आहे. अँड्रॉइड व्हर्जन 2.24.17.24 साठी व्हॉट्सॲप बीटामध्ये हे फीचर दिसून येत आहे.

तुम्ही तुमच्या WhatsApp अकाऊंट वर हे सेटिंग सक्रिय केल्यानंतर हे वैशिष्ट्य ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यानंतर तुमच्यासाठी अनोळखी असलेल्या WhatsApp अकाउंटला त्वरित ब्लॉक करते. WhatsApp आधीच दुर्भावनायुक्त, क्रियाकलाप आणि स्पॅम शोधण्यासाठी स्वयंचलित साधने प्रदान करत असताना वापरकर्त्यांना अनावश्यक किंवा त्रासदायक अशा संदेशांपासून स्वतःचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी, हे वैशिष्ट्य सुरक्षिततेच्या उद्देश्याने अधिक सक्रिय उपाय प्रदान करत आहे. स्कॅम करणाऱ्या आणि वापरकर्त्यांच्या गोपनीयतेशी तडजोड करू शकणाऱ्या किंवा त्यांच्या उपकरणांवर नकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या इतर संभाव्य धोकादायक गोष्टींपासून अतिरिक्त संरक्षण प्रदान करणे, हे या वैशिष्ट्या मागचे उद्दिष्ट आहे.

WhatsApp ने हे वैशिष्टय केव्हा लॉन्च होणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नसून लवकरच हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

WhatsApp चे नवीन वैशिष्टय कसे वापरावे. 


WhatsApp चे हे नवीन वैशिष्ट्य वापरण्यासाठी सर्वांत आधी तुम्हाला तुमचे अकाऊंट उघडायला हवे. त्यानंतर तुम्हाला वरील उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूवर क्लिक करून Settings मध्ये जायचे आहे. येथे Peivacy आणि पुढे Advanced वर क्लिक करा. हे वैशिष्ट्य लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला येथेच दिसून येईल. ज्यामध्ये तुम्हाला Accept, Block आणि Report असे तीन पर्याय देण्यात येतील. यामध्ये defualt सेटिंगचा पर्याय तुम्हाला देण्यात येईल, ज्यामुळे काहीही न करता तुम्ही त्वरित अनोळखी खात्याला ब्लॉक करू शकता. जोपर्यंत प्राप्तकर्ता संदेश विनंती स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला वाचलेल्या पावत्या दाखवल्या जात नाहीत, तर इतर पर्याय तुम्हाला भविष्यात प्राप्तकर्त्याशी संपर्क साधण्यापासून प्रतिबंधित करतात.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple च्या टीझरने वाढवली ग्राहकांची उत्सुकता; M5 MacBook Pro लॉन्चची तयारी सुरू
  2. Realme GT 8 Series कधी येणार बाजारात? Realme ने पहा केलेली मोठी घोषणा
  3. YouTube ने जारी केले मोठे अपडेटस; आधुनिक Video Player आणि Threaded Replies फीचर जारी
  4. Moto X70 Air होणार चीन मध्ये लॉन्च; अल्ट्रा थीन स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये नवा फोन
  5. Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी
  6. Bose-ट्यून केलेले Noise Master Buds Max भारतात लॉन्च; मिळणार 60 तासांचा प्लेबॅक
  7. AI ची मज्जा अनुभवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये! Nano Banana आता लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये
  8. आता वेबपेज वाचायची गरज नाही; Gemini थेट देणार सारांश
  9. Redmi K90 Pro झाला Geekbench वर स्पॉट? Snapdragon 8 Elite Gen 5 Chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज; पहा अपडेट्स
  10. Nothing Phone 3a चं आता येणार लाईट व्हर्जन; समोर आले स्पेसिफिकेशन्सचे लीक्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »