WhatsApp कडून नव्या अपडेटची घोषणा; Chat Privacy सुरक्षित ठेवत दिसणार जाहिराती

WhatsAppच्या माहितीनुसार, तुमचे शहर किंवा देश, भाषा, तुम्ही फॉलो करत असलेले चॅनेल आणि तुम्ही जाहिरातींशी कसा संवाद साधता यासारख्या मर्यादित माहितीचा वापर करून जाहिराती वैयक्तिकृत केल्या जातील.

WhatsApp कडून नव्या अपडेटची घोषणा;  Chat Privacy सुरक्षित ठेवत दिसणार जाहिराती

Photo Credit: WhatsApp

व्हाट्सअॅप म्हणतो की चॅटमध्ये अजूनही एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असेल

महत्वाचे मुद्दे
  • व्हॉट्सअ‍ॅप कडून त्यांच्या स्टेटस फीचरमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात
  • प्रायव्हेट चॅट, कॉल आणि ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी जाहिरातींना लक्ष्य करण्यासाठ
  • जाहिरातींव्यतिरिक्त, व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल देखील सादर
जाहिरात

WhatsApp आता त्यांच्या मेसेजिंग अ‍ॅप वर जाहिराती सुरू करत आहे. 16 जून दिवशी मेटा ( Meta) कंपनीकडून त्याची घोषणा करण्यात आली आहे. जाहिराती प्रायव्हेट चॅट्स च्या आतमध्ये दिसणार नाहीत. अपडेट्स टॅबमध्ये यूजर्स त्यांचे स्टेटस अपलोड करतात आणि विविध चॅनेल एक्सप्लोर करतात. इंस्टाग्रामप्रमाणेच, जिथे यूजर्स काही स्टोरीजनंतर जाहिराती पाहतात, व्हॉट्सअॅप यूजर्सनाही अशाच प्रकारे जाहिराती दिल्या जातील. मेटाने एका ब्लॉग द्वारा अपडेट देताना स्टेटसमधील जाहिराती सोबतच चॅनेल सबस्क्रिप्शन, प्रमोटेड चॅनेल या दोन नव्या घोषणा देखील केल्या आहेत.WhatsApp, नुसार, जगभरात दररोज 1.5 अब्ज लोक अपडेट्स टॅब वापरतात, जे लक्षणीय कमाईची क्षमता अधोरेखित करते. "आम्ही वर्षानुवर्षे असा व्यवसाय तयार करण्याच्या आमच्या योजनांबद्दल बोलत आहोत जो तुमच्या वैयक्तिक चॅटमध्ये व्यत्यय आणणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे की अपडेट्स टॅब हे या नवीन वैशिष्ट्यांसाठी योग्य ठिकाण आहे." असे Meta ने म्हटले आहे.

"ही नवीन फीचर्स तुमच्या वैयक्तिक चॅट्सपासून दूर फक्त अपडेट्स टॅबवर दिसतील. याचा अर्थ असा की जर तुम्ही फक्त मित्र आणि प्रियजनांशी चॅट करण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी काहीच बदलणार नाही." असे कंपनीने पुढे म्हटले आहे. स्टेटस स्टोरीजमध्ये जाहिराती देण्याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप चॅनल सबस्क्रिप्शन आणि चॅनल प्रमोशनद्वारे देखील उत्पन्न निर्माण करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की हे सबस्क्रिप्शन पेमेंट अॅप स्टोअर्सद्वारे सुलभ केले जातील.जाहिराती पसरवण्यासाठी WhatsApp देश/शहर, भाषा आणि ते फॉलो करत असलेले चॅनेल यासारख्या यूजर्सच्या डेटाचा वापर करेल.

मेटाने स्पष्टपणे सांगितल्यानुसार, ते जाहिरातदारांना फोन नंबर शेअर किंवा विकणार नाही. शिवाय, ते असेही म्हणतात की प्रायव्हेट चॅट, कॉल आणि ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी जाहिरातींना लक्ष्य करण्यासाठी वापरले जाणार नाहीत आणि ते एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतील.

2014 मध्ये जेव्हा Meta ने व्हॉट्सअॅप विकत घेतले तेव्हा प्लॅटफॉर्मच्या भविष्याबद्दल आणि त्याच्या यूजर्सच्याा गोपनीयतेबद्दल चिंता होती. आता 11 वर्षांनंतर, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अखेर सहज, सोप्या, सुटसूटीत मेसेजिंग अ‍ॅप वर जाहिराती झळकवण्याचा मार्ग शोधला आहे.

जाहिरातींव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप चॅनेलसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल देखील सादर करत आहे. यूजर्स त्यांच्या आवडत्या चॅनेलवरील विशेष अपडेट्स मिळवण्यासाठी मासिक शुल्क भरू शकतील. याव्यतिरिक्त, प्रमोट केलेले चॅनेल आता एक्सप्लोर विभागात दाखवले जातील, ज्यामुळे अॅडमिन त्यांच्या कंटेंटची दृश्यमानता सुधारू शकतील.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Vivo X Fold 6 लीक: 200MP कॅमेरा आणि मोठी बॅटरी; Xiaomi Mix Fold 6 च्या लॉन्च टाइमलाइनचा खुलासा
  2. Xiaomi 17T Geekbench AI वर स्पॉट; Dimensity 8500 प्रोसेसर आणि 12GB RAMची शक्यता
  3. WhatsApp लवकरच Android वापरकर्त्यांसाठी नोटिफिकेशन बबल्स फीचर आणू शकते
  4. दुसऱ्या ताऱ्याचा पाहुणा! आंतरतारकीय धूमकेतू 3I/ATLAS ने उलगडले सौरमालेबाहेरील गूढ
  5. नासाच्या SPHEREx मोहिमेने सिग्नस X मध्ये प्रचंड अंतराळीय बर्फाचा शोध, पृथ्वीवरील पाण्याच्या उगमाचे संकेत
  6. Reliance Jio ने Snapchat+, FanCode आणि Gemini Pro सह Youth & Gaming Plan लॉन्च केला
  7. वनप्लस Nord CE 6 भारतात लॉन्चपूर्वी महत्त्वाचे फीचर्स समोर
  8. आसूस ExpertBook Ultra, P3 आणि P5 सीरिज भारतात लॉन्च
  9. boAt Aavante Prime X साउंडबार भारतात लॉन्च; Dolby Atmos आणि 7.1.4 चॅनल सपोर्ट
  10. व्हॉट्सअ‍ॅपवर आता मोबाईल रिचार्ज शक्य; एअरटेल, जिओ आणि व्हीआय ग्राहकांसाठी नवीन सुविधा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »