YouTube मध्ये कस्टम-लाइक अॅनिमेशन मिळणार आहे. जेव्हा तुम्ही काही व्हिडिओंवर "लाइक" बटण दाबता तेव्हा तुम्हाला कंटेंटशी जोडलेले स्पेशल इफेक्ट्स दिसतील.
Photo Credit: YouTube
Watch Later आणि playlist फीचरसह व्हिडिओ सेव्ह करणे सोपे होईल
गूगलच्या मालकीचं लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अॅप युट्युब जगभर प्रसिद्ध आहे. आता त्याच YouTube ला मोठा व्हिज्युअल आणि फीचर रिफ्रेश मिळाला आहे ज्याच्यामुळे व्हिडिओ पाहणं, त्याच्यावर संवाद साधणं या गोष्टी अधिक सुलभ होणार आहेत. एका ब्लॉग पोस्ट मधून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. युट्युब वरील हा बदल मोबाईल, वेब आणि टीव्ही अॅप वर करण्यात आला आहे. दरम्यान अॅपसोबत यूजर्स अधिक प्रमाणात आणि अधिक वेळ जोडले रहावेत यासाठी हे अपडेट्स करण्यात आले आहेत.यूजर्सना यूट्युब वर दिसणारा पहिला बदल म्हणजे त्यांना video player design बदललेलं दिसणार आहे. आता कंट्रोल्स खूप स्पष्टपणे दिसणार आहेत. Buttons आणि icons हे स्पष्टपणे वाचता येणार आहेत आणि स्क्रीन वर देखील फारच कमी जागा घेणार आहेत. त्यामुळे छोटे मोबाईल वापरणार्यांना ते स्पष्ट दिसू शकतील. “double-tap to skip” हे फीचर देखील आता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठीची प्रक्रिया देखील आता चांगली केली जाईल आणि अधिक नैसर्गिक वाटेल. मोबाइलवर, चांगल्या मोशन डिझाइनमुळे,“Home,” “Shorts,” आणि “Subscriptions” सारख्या टॅबमध्ये जाणे देखील जलद आणि अधिक सहज वाटेल.
YouTube फक्त लूकमध्ये सुधारणा करत नाही; तर ते एंगेजमेंटला अधिक मजेदार बनवत आहे. अपडेट केलेल्या YouTube मध्ये कस्टम-लाइक अॅनिमेशन मिळणार आहे. जेव्हा तुम्ही काही व्हिडिओंवर "लाइक" बटण दाबता तेव्हा तुम्हाला कंटेंटशी जोडलेले स्पेशल इफेक्ट्स दिसतील. उदाहरणार्थ, म्युझिक व्हिडिओ फ्लोटिंग म्युझिकल नोट ट्रिगर करू शकतात, तर स्पोर्ट्स व्हिडिओ गेममधून अॅनिमेशन दाखवू शकतात. हा एक छोटासा टच आहे, परंतु तो इंटरअॅकशन्समध्ये पर्सनॅलिटी जोडतो.
नव्याने आलेल्या Watch Later आणि playlist feature सह व्हिडिओ सेव्ह करणे देखील सोपे होणार आहे. नवीन लेआउट तुमचा व्हिडिओ बघण्याचा फ्लो न मोडता लिस्ट मध्ये व्हिडिओ अॅड करण्याची मुभा देणार आहे.
युट्युब आता यूजर्स कमेंट्सना कसे अधिक चांगल्याप्रकारे वाचू शकतील, रिप्लाय करू शकतील यासाठी बदल करणार आहेत. नवी comment threading system groups अधिक चांगल्याप्रकारे प्रतिसाद देऊ शकणार आहेत. त्यामुळे संवादाचा फॉलो अप ठेवणंही सोप्पं होणार आहे. कोण कोणाला रिप्लाय देत आहे हे देखील स्पष्टपणे पाहता येणार आहे.
नैराश्य, चिंता, ADHD आणि खाण्याच्या विकारांसारख्या सामान्य मानसिक आरोग्य, हेल्थ आणि वेलबिईंग विषयांवर वयानुसार माहिती शोधताना, किशोरवयीन यूजर्सना आता विश्वासार्ह स्त्रोतांकडून व्हिडिओंचा एक शेल्फ दिसेल
जाहिरात
जाहिरात