Photo Credit: YouTube
YouTube आता त्यांच्या अॅड इंटरफेस वर दिसणारं “Skip Button” चा पर्याय लपवणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही युजर्सचं मत हे की skip button पूर्णपणे गायब आहे, तर इतरांना काउंटडाउन कालावधी संपल्यानंतर दिसत असल्याचे आढळले आहे. आता युट्युब कडून viewing experience सुधारण्याकडे लक्ष दिले जात आहे. सध्या युट्युब अॅड इंटरफेसवरील एलिमेंट्स कमी करण्यासाठी चाचणी करत आहे. आता शॉर्ट्सचा देखील वेळ वाढवण्याचा विचार केला जात आहे. 1 ऐवजी आता 3 मिनिटं शॉर्ट्स चालणार आहेत.
YouTube कडून ad interface वर मागील काही वर्षात अनेक ट्रान्सफरमेशन करण्यात आली आहेत. पण सध्याचं लेआऊट हे स्टॅडर्ड आहे. आता skippable ads आणि unskippable ads आहेत. unskippable ads हे बॉटम बार वरील बटण दाखवतं की अॅड किती प्ले झाली आहे आणि किती वेळ बाकी आहे. skippable ads मध्ये काही अधिकची इलिमेंट्स देखील आहेत.
काऊंडडाऊन टायमर देखील 15-30 सेकंदाचा आहे जो स्किकेबल अॅड मध्ये दिसतो. युजर्सना जाहिरात पाहण्यासाठी किमान कालावधी दर्शविला जातो, परंतु एकदा टाइमर शून्यावर पोहोचला की, skip button दिसेल.
व्हिडिओवर लवकर परत येण्यासाठी युजर्स हे बटण टॅप करू शकतात. काही skippable ads मध्ये काउंटडाउन टाइमर देखील नसतो आणि युजर्स त्यांना थेट वगळू शकतात. Reddit user ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्ट मध्ये असा दावा केला आहे की स्कीप बटण आणि टायमर हे स्क्रीन वर असून देखील एका काळ्या चौकोनी ओव्हर ले ने झाकलेले होते. तसेच Android Police report च्या माहितीनुसार, काऊंटडाऊन टायमर होता पण skip button हे काही वेळाने आलं. काही X युजर्स ने देखील skip button दिसत नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान skip button नसणं हे युजर्सची तक्रार सध्या काही बदल केले जात असल्याने आलेल्या glitch मुळेही असू शकते असं म्हटलं आहे. अद्याप यावर युट्युब कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
YouTube spokesperson Oluwa Falodun यांनी The Verge ला दिलेल्या माहितीनुसार, ' युट्युब कडून skip button लपवले जाणार नाही. skippable ads, मध्ये बटण हे 5 सेकंदानंतर playback वर दिसेल. त्यांनी आता युट्युब कडून अॅड वरील elements कमी केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. या बदलांमधील एक म्हणजे आता skip countdown timer हा progress bar म्हणून खाली दिसणार आहे.
जाहिरात
जाहिरात