Insta360 X5 लॉन्च झाला 8K 360° Action Camera, AI chip सह; पहा अन्य फीचर्स

Insta360 X5 मध्ये दोन इमेजिंग चिप्स आहेत, तसेच 5nm AI चिप आहे जी नवीन PureVideo मोडला सपोर्ट करते.

Insta360 X5 लॉन्च झाला  8K 360° Action Camera, AI chip सह; पहा अन्य फीचर्स

Photo Credit: Insta360

Insta360 X5 समोर (डावीकडे) आणि मागील

महत्वाचे मुद्दे
  • Insta360 X5 ची भारतामधील किंमत Rs. 54,990
  • Insta360 मध्ये बदलण्यायोग्य लेन्स सिस्टम देखील आहेत
  • हा कॅमेरा अमेझॉन, आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून विकत घेता येणार
जाहिरात

Insta360 X5 भारतामद्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला आहे. हा नवा 360 डिग्री कॅमेरा आहे. या कॅमेर्‍यामध्ये 1/1.28-inch sensors आणि 8K/30fps 360-degree video शूट करण्याची क्षमता आहे. कंपनीने AI वर अवलंबून असलेल्या नवीन प्युअरव्हिडिओ लो-लाइट मोडचा देखील प्रचार केला आहे. Insta360 मध्ये बदलण्यायोग्य लेन्स सिस्टम देखील आहेत. ज्या यूजर्स ना खराब झालेल्या लेन्सची अदलाबदल करता येते. ते तीन तासांचे विस्तारित बॅटरी लाइफ देखील देते आणि 49 फूट पर्यंत वॉटरप्रूफ आहे.Insta360 X5 ची किंमत आणि उपलब्धता,Insta360 X5 ची भारतामधील किंमत Rs. 54,990 आहे. हा कॅमेरा अमेझॉन, आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून विकत घेता येणार आहे. भारतातील ग्राहक Insta360 X5 Essentials Bundle देखील खरेदी करू शकतात. ज्यामध्ये अतिरिक्त बॅटरी, युटिलिटी फास्ट चार्ज केस, सेल्फी स्टिक, स्टँडर्ड लेन्स गार्ड्स, लेन्स कॅप आणि कॅरींग केस समाविष्ट आहे. याची किंमत भारतात 67,990 रुपये आहे.

Insta360 X5 ची फीचर्स

Insta360 X5 हा Insta360 X4 चा उत्तराधिकारी आहे. यामध्ये 1/1.28-inch sensors आहे आणि f/2.0 aperture आहे. यामध्ये 8K/30fps 360-degree video रेकॉर्डिंगची क्षमता आहे तर सिंगल लेंस मध्ये 4K/60fps पर्यंत क्षमता आहे. Insta360 X5 हा 360-degree video, PureVideo, Timelapse, Bullet Time, Loop Recording, Road Mode, आणि TimeShit modes मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याला सपोर्ट करतो.

Insta360 X5 कॅमेरा हा 72-megapixel आणि 18-megapixel पर्यंतच्या इमेजेस कॅप्चर करतो. हा Photo (with HDR), Interval, Starlapse, आणि Burst modes ला सपोर्ट करतो. नव्या कॅमेर्‍याचा सेंसर हा Insta360 X4 च्या तुलनेत 144% मोठा आहे.

Insta360 X5 मध्ये दोन इमेजिंग चिप्स आहेत, तसेच 5nm AI चिप आहे जी नवीन PureVideo मोडला सपोर्ट करते. जे यूजर्सना कमी प्रकाशात व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. या मध्ये six-axis gyroscope आहे. Wi-Fi 5, Bluetooth 5.2 (Low Energy) आणि USB 3.0 Type-C connectivity आहे.

Insta360 X5 मधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिप्लेसमेंट लेन्स किट, ज्याच्या द्वारे लेन्स खराब झाल्यास बदलता येतात. Insta360 X5 मध्ये 2,400mAh बॅटरी आहे, जी 20 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीचा दावा आहे की Insta360 X5 एका चार्जवर 5.7K/24fps रिझोल्यूशनवर 185 मिनिटे रेकॉर्डिंग देते, जेव्हा Endurance mode अ‍ॅक्टिव्ह केला जातो - ही संख्या 8K/30fps व्हिडिओसाठी 88 मिनिटांपर्यंत कमी होते. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68 रेटिंग आहे आणि ते 49 फूट (15 मीटर) पर्यंत water-resistant आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

संबंधित बातमी

फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »