Photo Credit: Insta360
Insta360 Ace Pro 2 हा जगभर मंगळवारी (22 ऑक्टोबर) लॉन्च झाला आहे. हा Ace Pro च्या पुढील आहे. Ace series मध्ये आता अॅक्शन कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारा चांगले फोटोज काढता येणार आहेत. यात कॅमेरासोबत artificial intelligence चा देखील वापर करण्यात आला आहे. यामधील फीचर्स पाहता आता 8K video recording आहे. 39 मीटर पर्यंत वॉटर प्रुफिंग आहे. Pro imaging chip आहे तसेच Leica-engineered colour profiles आहेत.
Insta360 Ace Pro 2 ची किंमत $399.99 पासून सुरू होते. ही भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 34 हजार आहे. या Standard bundle मध्ये wind guard, battery, standard mount, mic cap आणि USB Type-C cable आहे. सोबतच अॅक्शन कॅमेरा आहे. ज्यात Dual Battery bundle चा समावेश आहे. याची किंमत $419.99 म्हणजे 35 हजार रूपये आहे. Insta360 हा सध्या खरेदीसाठी ब्रॅन्ड वेबसाईड वर उपलब्ध आहे. तर जगभरात काही रिटेल पार्टनर्ससोबतही उपलब्ध आहे.
Insta360 Ace Pro 2 मध्ये 1/1.3-inch 8K sensor आहे. ज्याची डायनॅमिक रेंज 13.5 stops पर्यंत आहे. यामध्ये व्हिडिओ हा 8K पर्यंत 30fps ने टिपला जाऊ शकतो. 4K 60fps Active HDR,आणि 4K 120fps हा slow motion in MP4 format मध्ये टिपला जाईल. यासोबतच कमाल 50-megapixel मध्ये यात फोटो टिपला जाऊ शकतो.
अॅक्शन कॅमेरा मुळे PureVideo हा खास शूटिंग मोड देखील उपलब्ध असेल. Insta360 च्या माहितीनुसार, Ace Pro 2 हा आवाज किंवा काही अॅक्शन च्या मदतीनेदेखील कंट्रोल केला जाऊ शकतो. AI-powered creator-friendly असल्याने Auto Edit आणि AI Highlights Assistant यामध्ये आहे.
Insta360 Ace Pro 2 मध्ये 2.5-inch touchscreen display आहे. त्यामुळे 70% अधिक pixel density,6% अधिक ब्राईटनेस आहे. अॅक्शन कॅमेरामुळे FlowState Stabilisation आहे, ज्यामुळे स्थिर व्हिडिओ घेता येऊ शकतात.
Insta360 Ace Pro 2 मध्ये removable lens guard आहे. हा वॉटरप्रुफ असल्याने 12 मीटर खाली जाऊ शकतो. -20 डिग्री पर्यंत थंड वातावरणातही काम करू शकतो. यामध्ये 1,800mAh battery आहे. ज्यात नवे Endurance mode आहे. यामुळे 4K 30fps मध्ये 50% अधिक चालू शकते. 18 मिनिटांमध्ये 80% चार्जिंग तर 47 मिनिटांत पूर्ण 100% चार्जिंग होणार आहे.
जाहिरात
जाहिरात