Photo Credit: Amazon
Amazon या लोकप्रिय इ कॉमर्स वेबसाईटवर यंदाच्या आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर Amazon Great Indian Festival सुरू झाला आहे. हा फेस्टिवल Amazon Prime members साठी आधी सुरू झाला आहे. प्रत्येकवर्षी अमेझॉन त्यांच्या Prime subscription घेतलेल्या युजर्सना इतर युजर्सच्या तुलनेत 24 तास आधी खरेदीसाठी दिली गेली आहे. स्मार्टफोन ते लॅपटॉप, टॅबलेट्स आणि अन्य अॅक्सेसरीज वर दमदार सूट मिळणार आहे. एसबीआय च्या क्रेडीट आणि डेबिट कार्ड युजर्स त्याच्या वापरावर अधिकची डिस्काऊंट मिळवू शकतात. काही जुनी प्रोडक्ट्स एक्सचेंज करून देखील मोठी सूट मिळवता येऊ शकणार आहे.
अमेझॉन प्रमाणेच त्यांचे प्रतिस्पर्धी Flipkart यांचा Big Billion Days sale देखील सुरू झाला आहे. तो केवळ Flipkart Plus members सुरू झाला आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही त्यांच्या युजर्सना 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीला ही डिस्काऊंट्स लागू होणार आहेत. या दोन्ही साईट वर प्रोडक्ट्स पाहून किंमतीतील तफावत पाहून खरेदी करू शकणार आहेत.
Apple चा iPhone 13 आता 41,180 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. सेलमध्ये हा फोन 59,900 या त्याच्या मूळ किंमतीपेक्षा स्वस्त मिळत आहे. हे डील सध्या Amazon Prime members साठी आहे. Honor 200 5G हा स्मार्टफोन जो मूळ 34,999 रूपयांचा आहे तो 29,999 मध्ये उपलब्ध होणार आहे.
Samsung Galaxy S23 Ultra 5G जो 1,44,999 रूपयांना लॉन्च झाला होता अमेझॉन वर 84,999 रूपयांना उपलब्ध होता तो आता सेल मध्ये 74,999 मध्ये मिळणार आहे. खरेदी करताना 2000 रूपयांची अधिकची सूट देखील देणार आहे.
Samsung चा मिडरेंज Galaxy M35 5G हा फोन 19,999 रूपयांना उपलब्ध आहे तो या सेल मध्ये 15,999 रूपयांना मिळणार आहे. कस्टमर्स Galaxy M15 5G हा स्मार्टफोन 15,999 ऐवजी 10,999 मध्ये विकत घेता येणार आहे.
Amazon कडून iPad (10th Generation, 64GB) देखील भारतामध्ये 29,999 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. भारतात हा लॉन्च झाला तेव्हा 44,900 रूपयांना उपलब्ध होता आणि आता तो 34,900 मध्ये मिळत होता. Samsung Galaxy Tab S9 FE देखील 34,900 ऐवजी 26,999 मध्ये विकत घेता येणार आहे.
Wireless audio devices आणि smart TVs देखील Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये स्वस्तात विकत घेता येणार आहे. Sony WH-1000XM5 हेडफोन 25,990 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. Samsung's D-Series 43-inch 4K LED TV देखील 36,990 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. या डिलमध्ये तुमची मनपसंत वस्तू चांगल्या डिस्काऊंट सह विकत घेता येणार आहे.
जाहिरात
जाहिरात