Photo Credit: Amazon
Amazon Great Republic Day sale 2025 ची तारीख आता समोर आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पुढील आठवड्यात काही वस्तूंवर मोठी डिस्काऊंट्स मिळणार आहेत. Amazon Prime members ना या सेल मध्ये सहभागी होण्यासाठी आगाऊ संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. अमेझॉन कडून आता स्मार्टफोन्स वर 40% सूट जाहीर करण्यात आली आहे. तर स्मार्ट टीव्ही आणि प्रोजेक्टर्स वर 65% सूट आहे. अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू, अमेझॉन डिव्हाईस, लॅपटॉप्स, फॅशन प्रोडक्ट्स, किचन मधील वस्तू यांच्यावर देखील मोठी सूट मिळणार असल्याची माहिती आहे.
Amazon Great Republic Day sale 2025 ची सुरूवात 13 जानेवारीला सार्यांसाठी होणार आहे. तर प्राईम मेंबर्स साठी ही ऑफर त्याआधी 12 तास सुरू होणार आहे. दरम्यान हा सेल नेमका संपणार कधी याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अमेझॉन कडून SBI शी करार करण्यात आला आहे. त्यामुळे एसबीआय युजर्सना 10% अधिकची सूट मिळनार आहे. ही त्यांच्या क्रेडिट कार्ड्स आणि EMI व्यवहारांवर मिळणार आहे. ICICI Amazon Pay credit card च्या युजर्ससाठी देखील अधिकच्या ऑफर्स आहेत. सोबतच एक्सचेंज डिस्काऊंट्स आणि कूपन्स डिस्कऊंट्स देखील आहेत.
Amazon Great Republic Day Sale मध्ये यंदा मोबाईल फोन वर 40% सूट मिळणार आहे. यामध्ये Apple, OnePlus, Samsung, iQoo, Realme, आणि Xiaomi या फोनचा समावेश आहे. यासाठी खास मायक्रोसाईट बनवण्यात आली असून त्याच्याद्वारा महत्त्वाच्या ऑफर्सची माहिती दिली जात आहे.
OnePlus 13, OnePlus 13R, iQOO 13 5G, iPhone 15,Samsung Galaxy M35 5G या नव्या स्मार्टफोन्स वर हमखास ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. Honor 200 5G, Galaxy S23 Ultra, Realme Narzo N61 आणि Redmi Note 14 5G हे स्मार्टफोन देखील सवलतीच्या दरात विकत घेतले जाऊ शकतात. फोन च्या डील प्राईजेस अजून सांगण्यात आलेल्या नाहीत.
आगामी Amazon Great Republic Day Sale मध्ये स्मार्ट टीव्ही, होम अप्लायंसेस आणि प्रोजेक्टर यांच्यावर 65% सूट आहे. इलेक्ट्रोनिक्स आणि अप्लायंसेस ज्यामध्ये इयरफोन, स्मार्टवॉच, माऊस यांचा समावेश होतो त्यांच्या किंमती 199 रूपयांपासून सुरू होतात. Amazon's Alexa आणि Fire TV products ची सुरूवात 2599 रूपयांपासून होत आहे.
Amazon कडून फॅशन प्रोडक्ट्स हे देखील 199 रूपयांपासून सुरू होत आहेत. नेहमीच्या वापरातील वस्तू 149 रूपयांपासून सुरू होत आहेत. ट्रॅव्हल बूकिंग वर अमेझॉन पे च्या माध्यमातून 50% सूट दिली जाणार आहे. अमेझॉन कडून येत्या काही दिवसांत या सेल बाबत काही महत्त्वाची अजून माहिती दिली जाऊ शकते.
जाहिरात
जाहिरात