Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट

Amazon Prime Day 2025 सेल 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून 14 जुलै संपेपर्यंत म्हणजे एकूण 72 तास सुरू राहणार आहे.

Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट

Photo Credit: Amazon

अमेझॉन प्राइम डे २०२५ सेल केवळ प्राइम सदस्यांसाठी आहे

महत्वाचे मुद्दे
  • Amazon Prime Day 2025 सेल 12 ते 14 जुलै दरम्यान
  • Amazon Prime Members ना 60,000 रुपयांपर्यंतच्या exchange offers
  • क्रेडिट कार्ड, ईएमआय व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सेव्हिंग देण्
जाहिरात

Amazon India कडून Prime Day 2025 Sale Deals ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स वर खास डील्स मिळणार आहेत. तसेच अनेक वस्तूंवर घसघशीत सूट देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स पासून घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू अपग्रेड करणार्‍यांना ही हा सेल म्हणजे अनेक दर्जेदार प्रोडक्ट्स स्वस्त दरात विकत घेण्याची संधी आहे. यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, अमेझॉन डिवाईज, फॅशन्, ब्युटी प्रोडक्ट्स वस्तूंची खरेदी करता येणार आहे.अमेझॉन त्यांच्या Prime Day 2025 सेलसाठी सज्ज होत आहे. हा सेल 12 जुलै दिवशी मध्यरात्रीपासून सुरू होईल आणि 14 जुलै रोजी रात्री 11.59 पर्यंत चालणार आहे. हा सेल केवळ अमेझॉन प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध आहे, इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलती मिळणार आहेत ज्यामध्ये आयफोन 15 वर देखील अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. अमेझॉनच्या सेलमध्ये सर्वात आकर्षक डीलपैकी एक डील ही आयफोनची असण्याची अपेक्षा आहे.

स्मार्टफोन मधील ऑफर्स

आयफोन 15 हा 79,900 रुपयांमध्ये सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला आहे आता तो 60,500 रुपयांना लिस्ट झाला आहे आणि प्राइम डे सेल दरम्यान त्यावर आणखी सूट मिळण्याची अपेक्षा आहे.अमेझॉनच्या 72 तासांच्या या सेल मध्ये Samsung Galaxy M36 5G, OnePlus Nord 5, OnePlus Nord CE 5, iQOO Z10 Lite 5G, Realme Narzo 80 Lite 5G, Honor X9c, Oppo Reno 14 series, आणि Lava Storm Lite 5G फोन उपलब्ध असणार आहे.

लॅपटॉप वरील ऑफर्स

Prime Day 2025 सेल मध्ये स्मार्ट फोन प्रमाणे लॅपटॉप्स वर देखील आकर्षक सूट आहे. यामध्ये 40% सूट मिळण्याचा अंदाज आहे. लॅपटॉप्स आणि स्पीकर्स वर देखील 60% सूट मिळणार आहे. Samsung Galaxy Tab S9 FE 44,999 रुपयांच्या मूळ किमतीऐवजी 28,999 रुपयांना विकत घेता येणार आहे. HP OmniBook 5, Asus Vivobook 15,Acer Aspire Lite च्या किंमतीही कमी होणार आहेत.

Amazon Prime Day 2025 मधील ऑफर्स काय?

Amazon Prime Members ना 60,000 रुपयांपर्यंतच्या exchange offers आणि 24 महिन्यांपर्यंत no-cost EMI पर्यायांसाठी पात्र आहेत. क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सेव्हिंग देण्यासाठी अमेझॉनने ICICI आणि SBI Bank सोबत भागीदारी केली आहे. ICICI Bank debit card यूजर्सना देखील सवलती मिळतील, तर Amazon Pay ICICI bank credit card धारकांना अतिरिक्त फायदे मिळतील.

Amazon Echo डिव्हाइसेस, Fire TV स्टिक आणि Kindle ई-रीडर्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार. Electronics enthusiasts हेडफोन्सवर 80 टक्के, टॅब्लेट आणि स्पीकर्सवर 60टक्के, वेअरेबल आणि कॅमेऱ्यांवर 50 टक्के सूट मिळवू शकतात.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. ग्राहकांना दिलासा; Sanchar Saathi अॅप प्री-इन्स्टॉल सक्ती हटवली
  2. Poco C85 5G भारतात येणार; महत्वाच्या वैशिष्ट्यांसह फीचर्सही ठरले
  3. Redmi 15C 5G भारतात लॉन्च; 5G सपोर्ट, Dimensity 6300 आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  4. Apple iPhone 17e ला अल्ट्रा-स्लिम बेझल्स आणि डायनॅमिक आयलंड मिळणार?
  5. डेटा प्रायव्हसीचा मुद्दा? Sanchar Saathi अ‍ॅप प्री-इन्स्टॉल आदेशाला Apple चा विरोध
  6. Samsung Galaxy Z TriFold ची किंमत लीक; भारतातील संभाव्य किंमत समोर
  7. Croma वर iPhone 16 ची किंमत Rs. 63,000 च्या खाली; बँक डिस्काउंटसह मोठी सूट
  8. GSMA लिस्टिंगनुसार Samsung Galaxy Z Fold 8 बरोबरच Wider मॉडेलचीही एन्ट्री
  9. Vivo X300 Pro भारतात लॉन्च झाला! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  10. Vivo X300 Pro भारतात लॉन्च झाला! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »