एलन मस्कच्या स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यास मान्यता; पहा काय असू शकतात दर?

अमेरिकेत, स्टारलिंकच्या उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा रेसिडेन्शियल लाइट योजनेसाठी दरमहा $80 (अंदाजे रु.6800) पासून सुरू होतात.

एलन मस्कच्या स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यास मान्यता; पहा काय असू शकतात दर?

Photo Credit: Starlink

स्पेसएक्स एक रिसीव्हर किट ऑफर करते जे दुर्गम भागात देखील स्टारलिंक उपग्रह कनेक्शन सक्षम करते

महत्वाचे मुद्दे
  • स्टारलिंकला सरकारकडून दूरसंचार विभाग (DoT) कडून Letter of Intent स्वरूपात
  • SpaceX च्या मालकीच्या कंपनीच्या योजनांची किंमत दरमहा 850 रुपयांपेक्षा कमी
  • स्टारलिंक उपग्रह इंटरनेट प्रदान करण्यासाठी LEO उपग्रहांच्या जाळ्याचा वापर
जाहिरात

बहुतेक नियामक अडथळे दूर केल्यानंतर आता एलन मस्क च्या Starlink ची भारतात satellite communication services सुरू करण्याच्या तयारीला वेग आल्याचं सांगण्यात आलं आहे. जसा लॉन्च जवळ येत आह्हे तसे आता प्लॅन्सच्या दरांबद्दल माहिती समोर आली आहे. प्रतिमहिना हे दर कमीत कमी दहा डॉलर म्हणजे 850 रूपये असू शकतात. सुरुवातीच्या प्रमोशनल योजनांमधून, ग्राहकांना अमर्यादित डेटा प्लॅन ऑफर केले जाऊ शकतात. यासह, Elon Musk-backed कंपनी व्हॉल्यूम फायद्यांमुळे होणाऱ्या high spectrum खर्चाची भरपाई करण्यासाठी यूजर्सची संख्या वेगाने 1 कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.Starlink चे भारतामधील प्लॅन्स चे दर,स्टारलिंकला सरकारकडून दूरसंचार विभाग (DoT) कडून Letter of Intent स्वरूपात मान्यता मिळाली, ज्यामुळे त्यांना भारतात satellite communication services सुरू करण्याची परवानगी मिळाली. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) प्रति शहरी युजर्स शुल्क म्हणून दरमहा 500 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्याची शिफारस केल्याचे म्हटले जात आहे. ज्यामुळे satellite-based internet services वायर्ड आणि वायरलेस ब्रॉडबँड कनेक्शनपेक्षा महाग होण्याची शक्यता आहे. काही शिफारसी अद्याप सरकारकडून मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

SpaceX च्या मालकीच्या कंपनीच्या योजनांची किंमत दरमहा 850 रुपयांपेक्षा कमी असल्याचे वृत्त आहे, तसेच प्रमोशनल ऑफर्सचा भाग म्हणून अमर्यादित डेटा बंडल केला जात आहे. जर हे अचूक ठरले, तर स्टारलिंकचा भारतातील प्लॅन जगातील सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक होईल.

Starlink म्हणजे काय आणि त्याची किंमत किती आहे?

स्टारलिंक ही अब्जाधीश एलोन मस्क यांच्या खाजगी अंतराळ कंपनी स्पेसएक्सने विकसित केलेली एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. ती उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गम भागातही ग्राहकांना हाय-स्पीड, कमी-लेटन्सी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देते. ही कंपनी पृथ्वीपासून 550 किमी वर स्थित लो अर्थ ऑर्बिट किंवा LEO उपग्रहांच्या नक्षत्राचे जगातील सर्वात मोठे नेटवर्क वापरते.

अमेरिकेत, स्टारलिंकच्या उपग्रह-आधारित इंटरनेट सेवांसाठी Residential Lite plan ची किंमत दरमहा $80 (अंदाजे रु. 6,800) आहे, जो अमर्यादित परंतु deprioritised data देतो. ग्राहकांना अतिरिक्त स्टारलिंक standard kit देखील खरेदी करावी लागेल ज्यासाठी $349 (अंदाजे रु. 29,700) शुल्क आहे.

एलोन मस्कच्या मालकीची कंपनी रोम प्लॅन देखील ऑफर करते जे नेहमी प्रवासात राहणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत. Roam 50 planची किंमत $50 (अंदाजे 4200 रुपये) पासून सुरू होते ज्यामध्ये 50 जीबी डेटा बंडल केला जातो. रोम प्लॅन निवडल्यास स्टारलिंक मिनी किटसाठी $299 (अंदाजे 25,400 रुपये) अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung कडून One UI 8 अपडेटमध्ये कस्टम ROM चा मार्ग बंद होणार असल्याची चर्चा; पहा अपडेट
  2. Oppo Reno 14FS 5G AMOLED Display, 50MP Camera सह प्रिमियम फीचर्स; पहा अपडेट्स
  3. Realme 15 सीरिज लॉन्च; AI फीचर्स, 80W चार्जिंग सह पहा फीचर्स
  4. Infinix Smart 10 सह 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा; पहा दमदार फीचर्स
  5. कर्व्ह डिस्प्ले, 50MP कॅमेरा, 6720mAh बॅटरी सह येणार मोटोरोला चा नवा स्मार्टफोन Moto G86 Power 5G
  6. itel चा सुपर गुरु 4G Max फोन झाला लॉन्च; 13 भाषांमध्ये मिळणार सपोर्ट
  7. Lava Blaze Dragon लवकरच बाजरात येणार नवा 5G फोन दहा हजार पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणार
  8. Redmi कडून दोन नवीन फोन लाँच करत 11 व्या वर्षपूर्तीचं स्पेशल सेलिब्रेशन
  9. Asus Vivobook 14 Copilot+ PC भारतात लॉन्च; किंमत 65,990 पासून सुरू
  10. Vodafone Idea चे प्रीपेड युजर्सना दिली खुशखबर; पहा काय खास
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »