फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 27 सप्टेंबर पासून होणार सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, टीव्हींवर मिळणार दमदार सूट

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये सवलतीच्या दरामध्ये फोन विकत घेता येऊ शकतात. यामध्ये काही बॅंकांच्या ऑफर्स देखील मदत करणार आहेत

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 27 सप्टेंबर पासून होणार सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, टीव्हींवर मिळणार दमदार सूट

Photo Credit: Flipkart

Flipkart Big Billion Days is the e-commerce platform's biggest sale of the year

महत्वाचे मुद्दे
  • फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 27 सप्टेंबर पासून होणार सुरू
  • गूगल पिक्सेल 8, सॅमसंग गॅलेक्सी एस 23 हे फोन्स 40 हजारापेक्षा कमी मध्ये
  • Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरण्यावर नो-कॉस्ट EMI चा पर्याय
जाहिरात

भारतामध्ये आता सण समारंभाचे दिवस सुरू होणार आहे. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि त्यापाठोपाठ येणारं न्यू इयर पाहता खरेदीचे दिवस सुरू होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2024 सुरू होत आहे. हा सेल 27 सप्टेंबर पासून सार्‍या ग्राहकांसाठी सुरू होत आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना सेल च्या 24 तास आधी म्हणजे 26 सप्टेंबर पासून खरेदी सुरू होणार आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) मध्ये युजर्सना स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही आणि अन्य वस्तूंवर मोठी डिस्काऊंट्स मिळणार आहेत. या सेल मध्ये गूगल पिक्सेल 8 (Google Pixel 8) आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 23 (Samsung Galaxy S23) सह अन्य स्मार्टफोन्स वर आकर्षक सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये कोणत्या फोनवर मिळणार आकर्षक सूट?

गूगल पिक्सेल 8 (Google Pixel 8) हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज चा फोन एरवी 75,999 रूपयांना मिळतो पण या सेल मध्ये 40 हजारापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस 23 (Samsung Galaxy S23) देखील 8 जीबी रॅम आणि 128 इनबिल्ट स्टोरेजचा फोन 89,999 रूपयांना मिळतो तोच या सेल मध्ये 40 हजारांपेक्षा कमी रूपयांना विकत घेता येणार आहे.

अद्याप स्मार्टफोनची या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये काय असेल त्याची माहिती देण्यात आलेली नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई (Samsung Galaxy S23 FE) बेस मॉडेल साधारण 79999 रूपयांना विकला जातो पण तो या सेल मध्ये 30 हजारा पेक्षा कमी रूपयात विकत घेता येणार आहे.

Poco X6 Pro 5G देखील 20 हजारांपेक्षा कमी रूपयांमध्ये विकत येऊ शकतो. अन्य स्मार्टफोनच्या विक्रीची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, CMF Phone 1, Nothing Phone 2a, Poco M6 Plus, Vivo T3X, Infinix Note 40 Pro,हे स्मार्टफोन्स देखील सवलतीच्या दरामध्ये फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये खरेदी करता येणार आहेत.

Motorola Edge 50 Fusion ची किंमत 19,999 रुपये असेल, तर Moto Edge 50 ची किंमत 24,999 रुपये असेल. फ्लिपकार्टच्या टीझर्सनुसार Moto Edge 50 Neo ची किंमत 22,999 रुपये आहे. ग्राहकांना या डिल्स दरम्यान सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कारण प्लॅटफॉर्म डीलच्या किंमती बदलत राहतो. त्यांच्या इच्छित फोनवर सर्वोत्तम सवलत ऑफर मिळविण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर डीलच्या किमती तपासण्याचा विचार केला जाऊ शकतो.

ऑफर्सचा देखील धमाका असणार

दरम्यान फ्लिपकार्ट वर सेलच्या दरम्यान अन्य काही ऑफर्स चा देखील फायदा घेता येऊ शकतो. यामध्ये काही बॅंकांकडून देखील क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड वापरताना काही सूट मिळू शकेल. Flipkart UPI च्या माध्यमातून व्यवहार करणार्‍या युजर्सना यावेळी 50 रूपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

फ्लिपकार्टने असेही म्हटले आहे की ग्राहकांना एक लाख रूपयांपर्यंत क्रेडिट मिळू शकते. फ्लिपकार्ट पे लेटर पेमेंट चा फायदा घेता येऊ शकतो. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरण्यावर नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डधारक त्यांच्या खरेदीवर 10% इन्स्टंट सवलत मिळणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iPhone Air 2 लाँच टाइमलाइन स्पष्ट; 2026 मध्ये घोषणा होणार असल्याचा दावा
  2. Flipkart ने उघड केला Motorola Signature सिरीजचा पहिला टीझर
  3. दमदार बॅटरी, हाय रिफ्रेश रेट स्क्रीनसह OnePlus Turbo येणार, लीक फोटोंमधून मिळाले संकेत
  4. Oppo K15 Turbo Pro स्पेसिफिकेशन लीक: मोठा कॅमेरा आणि MediaTek Dimensity 9500s अपेक्षित
  5. Galaxy A07 5G सर्टिफिकेशनमधून मोठ्या बॅटरीचे संकेत, आधीच्या मॉडेलपेक्षा वाढ
  6. HMD चे बजेट DUB Earbuds लॉन्च; फीचर्स, बॅटरी लाईफ, ANC आणि किंमत पहा
  7. Xiaomi Watch 5 मध्ये EMG + ECG सेन्सर, हेल्थ ट्रॅकिंगसाठी नवे फीचर्स
  8. Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत Flipkart वर घसरली; Rs 20,000 सूट, एक्सचेंज, EMI ऑफर्स
  9. OnePlus Nord 4 Amazon वर Rs. 24,000 पेक्षा कमी मध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन
  10. Oppo Find X8 Pro वर बंपर डिस्काउंट – कमी किमतीत फ्लॅगशिप फोन मिळवा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »