JioFinance App लॉन्च नंतर आता Google Play Store, Apple App Store,MyJio वर डाऊनलोड साठी उपलब्ध

JioFinance,युजर्स आता यूपीआय पेमेंट हे त्यांचं बॅंक अकाऊंट लिंक करून किंवा QR code स्कॅन करून देखील पूर्ण करू शकणार आहे

JioFinance App लॉन्च नंतर आता Google Play Store, Apple App Store,MyJio वर डाऊनलोड साठी उपलब्ध

Photo Credit: Jio

JioFinance app is available for download on the Google Play Store and App Store

महत्वाचे मुद्दे
  • JioFinance App 11 ऑक्टोबरला लॉन्च
  • Google Play Store, Apple App Store,MyJio वर अ‍ॅप डाऊनलोड साठी उपलब्ध
  • UPI International feature चा वापर करून cross-border payments देखील करता
जाहिरात

JioFinance app आज (11 ऑक्टोबर) भारतामध्ये लॉन्च झाले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार सुकर होणार आहेत. ही सेवा Jio Financial Services Limited कडून देण्यात आली आहे. आता देशामध्ये हे अ‍ॅप वापरण्यासाठी खुलं केलं जाणार आहे. यामध्ये यूपीआय ट्रान्झॅक्शन केले जाणार आहेत. म्युचल फंड मध्ये मॉनिटरिंग आणि गुंतवणूकीचा पर्याय देणार आहे. बिल देखील भरता येणार आहे. मे महिन्यात ते बीटा व्हर्जन मध्ये दिसणार आहे. JFSL चा दावा आहे 6 मिलियन लोकांनी या सेवेचा फायदा घेण्यास सुरूवात केली आहे.

JioFinance App चे फीचर्स काय?

JFSL च्या माहितीनुसार, JioFinance app आता Google Play Store आणि App Store वर डाऊनलोड साठी उपलब्ध असणार आहे. तर MyJio platform वरून देखील ते वापरता येणार आहे. JioFinance,युजर्स आता यूपीआय पेमेंट हे त्यांचं बॅंक अकाऊंट लिंक करून किंवा QR code स्कॅन करून देखील पूर्ण करू शकणार आहे. याचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे तसेच दुसर्‍या युजरला पैसे देऊ शकतो. अ‍ॅप च्या UPI International feature चा वापर करून cross-border payments देखील करता येऊ शकतं. या अ‍ॅप द्वारा UPI IDs काढणं, बॅंक अकाऊंट्स बदलल्णं आणि setting mandates चा देखील पर्याय देता येणार आहे. प्रत्येक UPI transaction सोबत रिवॉर्ड्स देखील दिले जाणार आहेत.

अ‍ॅपचा वापर केल्याने बॅंकिंगचा अनुभव देखील सुकर होणार आहे. यामध्ये झिरो बॅलंस सेव्हिंग अकाऊंट उघडता येणार आहे. या अकाऊंटचा वापर करून कस्टमर्सना फंड्स पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. JioFinance चा वापर करून देखील अन्य सेवा ज्यामध्ये बिल भरणं, मोबाईल, फास्टटॅग रिचार्ज, DTH recharge करता येणार आहे. क्रेडिट कार्डचं पेमेंट करता येणार आहे. 'लोन ऑन चॅट' देखील मिळणार आहे. JioFinance ॲपद्वारे दिलेली कर्ज सुविधा सर्व पगारदार आणि MSME ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

ॲप विमा सुविधा देखील देणार आहे या द्वारा JioFinance मध्ये जीवन, आरोग्य, दुचाकी आणि मोटर विमा योजना तपासू शकतात आणि मिळवू शकतात.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
  2. एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण
  3. Honor Magic V Flip 2 मध्ये 200MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, पहा अन्य स्पेसिफिकेशन्स काय?
  4. 2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम
  5. Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये नवा टेन्सर G5 प्रोसेसर, 8-इंच फोल्डेबल डिस्प्ले
  6. Tensor G5 चिप, AI कॅमेरा टेक्नॉलॉजीसह Google Pixel 10 Series भारतामध्ये लाँच
  7. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  8. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  9. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  10. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »